आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमध्ये राजकारणाच्या आगीत न बस जळाली ना बॉम्बफेक, 'विरोध करा, पण बस जाळू नका' : कुमार विश्वास

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जयपूर : 'या व्यासपीठाला प्रणाम.. तुम्हाला सलाम, ज्यांनी हे जपले त्यांना राम राम' अशा शब्दांनी डॉ. सुनील जोगी यांनी दैनिक भास्करचे आभार प्रकट करताना बुधवारी सायंकाळी अल्बर्ट हॉलमध्ये आयोजित कवी संमेलनाची सुरूवात केली. निमित्त होते, राजस्थानातील दैनिक भास्करच्या ऐतिहासिक यशाला २३ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयोजित 'भास्कर उत्सव'कार्यक्रमाचे. कवी कुमार विश्वास म्हणाले, देशाच्या आजच्या परिस्थितीवर मी बोलणार आहे. माजी पंतप्रधान अटलजी यांचे स्मरण करताना ते म्हणाले, सरकारची स्थापना होऊन तीन वर्षे झाली होती. प्रमोद महाजन यांनी कवी संमेलनासाठी दिल्लीला बोलावले. तेव्हा मी सर्वात लहान होतो. अटलजी समोरच बसलेले होते. काय बोलावे काय नाही, हेच मला उमगेनासे झाले होते. म्हणालो, 'कितने भी दिन लगाना, लेकिन परिणाम ठोस लाना,' माझी कविता ऐकून सर्वजण निराश झाले. परंतु अटलजी यांनी मला छायाचित्र काढण्यास बोलावले. कुमार म्हणाले, राजस्थानात आग पेटली पण बस जाळली नाही. विरोध करा...पण बस जाळू नका.

मुमताज यांनी सरस्वतीवर तर अमन अक्षर यांनी रामावर ऐकवली कविता

सुनील जोगीनंतर कवियत्री मुमताज यांनी 'सरस्वती मां.. सरस्वती मां, तेरे चरणोंमें अर्पण मेरे दो जहां, हे सरस्वती मां... ही कविता ऐकवली. त्यानंतर माइकचा ताबा घेत, 'सब जो कहते हैं, सुनने की काेशिश में हूं, अब चूपचाप रहने की काेशिश मे हूं...' या कवितेने सर्वांचे मन जिंकून घेतले. यानंतर प्रेमाच्या विडंबन करताना 'साथ हंसने लगे तो हंसी कमी लगी...' तसेच प्रभू रामचंद्रावर कविता ऐकवली. हास्य कवी सुदीप भोला यांनी यूपी निवडणुका, लोकांचा समजूतदारपणा आणि पोलिस, लष्करांवर कविता ऐकवल्या. कविता तिवारी यांनी 'घासवाली रोटीयों को खाके' कविता ऐकवली
 

बातम्या आणखी आहेत...