आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिडिटी, हृदयरोग, लठ्ठपणा आणि गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियमित जीवनशैलीमुळे त्रास जास्त वाढतो, यात अॅसिडिटी, हृदयरोग, लठ्ठपणा आणि गुडघेदुखीचा समावेश आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी काही आरोग्यदायी सवयी करा जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. 

अॅसिडिटीसाठी 
अनहेल्दी खाण्याच्या सवयींमुळे आजकाल अॅसिडिटीची समस्या वाढत आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात आल्याचा समावेश करा.हे शरीराचा पीएच स्तर संतुलित ठेवण्याचे कार्य करते. अाल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास फायदा होतो. अॅसिडिटी झाल्यास पुदिन्याची काही पाने पाण्यात उकळून आिण गार करून हे पाणी प्या. याप्रकारे हे शीतलता प्रदान करते. याशिवाय अॅलोव्हेराचा रस किंवा नारळ पाणीदेखील पोटामध्ये अॅसिडची पातळी कमी करण्यास सहायक आहे. जेवल्यानंतर साेप खाल्ल्यामुळेदेखील अॅसिडिटीपासून बचाव होतो. सोपमध्ये असणारी खनिजे, व्हिटॅमिन आिण फायबर्स पचनक्रियेमध्ये मदत करतात. 
आणखी काय करावे 
दिवसातून दोनदा पोटभर जेवण्याऐवजी चार ते पाचवेळा थोडे थोडे खा. याशिवाय जेवणानंतर झाेपू नका. यामुळे अॅसििडटी वाढण्याची शक्यता असते. तोंडातल्या लाळेला थुंकू नका तर िगळून घ्या. यामुळे अॅसिडिटीमध्ये होणारी जळजळ कमी होते. जर तुम्ही दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावली तर या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. अॅसिडिटीच्या समस्येपासून बचावासाठी व्यायाम आिण योगादेखील फायेदशीर आहे. जे नियमितपणे केल्यास अॅसिडिटीपासून बचाव होऊ शकतो. 

हृदयरोगासाठी 
हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी ओट्स किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खा. यासाठी ओटमिल चांगले आहे. निरोगी हृदयासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार झालेले जेवण फायदेशीर आहे. यामुळे चांगले कोलेस्टेराॅल वाढते. ओट‌्समध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅटस असतात जे हृदयासंबंधी समस्यांपासून बचाव करते. या प्रकारेच बदाम, अक्रोड आिण गुळादेखील कोलेस्टेराॅल वाढवण्यास सहायक आहे. कोलेस्टेराॅल मेंटेन करण्यासाठी कुकिंग ऑइल वेगवेगळे वापरावे. 
आणखी काय करावे 
लठ्ठपणापासून बचाव करा. तुमचे वजन हृदयासंबंधीच्या आजारामुळे वाढू शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका. मनोविकारतज्ञाच्या मते तणाव हृदयाच्या आजाराचे मुख्य कारण आहे. यामुळे तुम्हाला अायुष्य चांगले करण्यासाठी मदत मिळते. तणावापासून वाचण्यासाठी रक्तदाब सामन्य असणे गरजेचे आहे. सुदृढ जीवनशैली तुम्हाला हृदयासंबंधी समस्यांपासून वाचवण्यासाठी मदत करेल. यामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत मिळेल. याशिवाय जर तुम्हाला मधुमेह असेल तर विशेष काळजी घ्या. नाहीतर हृदयसंबंधी समस्या होऊ शकतात. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी 
वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा योगा आवश्यक आहे याशिवाय नैसर्गिक पदार्थ खाणे खूप आवश्यक आहे. बाजारात मिळणारे प्रोसेस्ड आिण हाय-कार्ब पदार्थ खाणे टाळा. याशिवाय दररोज कोमट पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आिण वजन कमी होऊ लागते. रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे, मोड आलेली कडधान्य आणि ऋुतूत येणारी फळे खाणे फायदेशीर आहे. यामुळे भूक लागत नाही आिण आपण जास्त खात नाही. 
आणखी काय करावे 
दररोज वॉकिंग, रनिंग किंवा जॉगिग करा. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो आिण वजन वेगाने कमी होऊ लागते. जर तुमच्याकडे सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी किंवा रात्रीही हे करू शकता, यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तुमच्या रोजच्या आहारात तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले पदार्थ खाणे चांगले असते. तळलेल्या पदार्थांत जास्त फॅट असतात, म्हणून भाजलेले पदार्थ खा. याप्रकारचे पदार्थ पचनक्रिया चांगली करण्यास मदतकरते. 

गुडघेदुखी दूर करण्यासाठी 
गुडघ्यात दुखणे असेल तर दालचिनी, जिरे आिण हळदीचा उपयोग जास्तीत जास्त करा. हे गरम पदार्थ आहेत. ज्यामुळे गुडघ्याची सूज आिण वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय अक्रोडदेखील गुडघ्याचे दुखणे कमी करण्यास मदत करते. यात प्रथिने, फॅट, अँटिऑक्सिडेंटस, कार्बोहायड्रेट‌्स, व्हिटॅमिन ई, बी ६, कॅल्शियम आिण खनिज यांची मात्रा पुरेशा प्रमाणात असते. रोज सकाळी िरकाम्या पोटी मेथीच्या वाटलेल्या दाण्यांमध्ये कलौंजी मिसळून काेमट पाण्यासोबत घ्या. यामुळे सांधे मजबूत होतात आिण वेदनाही दूर होतात. 
आणखी काय करावे 
गुडघ्यांमध्ये दुखणे असेल तर उंच टाचांची चप्पल घालू नका. यामुळे दुखणे वाढू शकते. नेहमी आरामदायी बूट-चप्पल घालण्याची सवय ठेवा. यामुळे गुडघ्यांच्या सांध्यावर दबाव पडत नाही. गुडघ्यांमध्ये सामान्य दुखणे असेल तर आराम करण्याऐवजी काम करा. तुम्ही कार्यरत राहिलात तर हाडे आिण मांसपेशी चांगल्याप्रकारे काम करू शकतात. मिठाच्या कोमट पाण्याने शेकणे आिण थोडा व्यायामदेखील तुमचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...