आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जाता का ? मग घ्या ही काळजी…

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जात असाल तर याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. पदार्थ पोटात जाताना होणारी ही प्रक्रिया म्हणजे सामान्य...मात्र व्यक्तीनुसार त्याची तीव्रता वेगळी असू शकते. अनेककदा लहान मुले खाल्ले की लगेच टॉयलेटकडे पळतात. खाल्ल्या खाल्ल्या लगेच शौचास होण्याची ही समस्या फक्त लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या व्यक्तींनाही उद्भवते. खाल्ल्यानंतर लगेच शौच होण्याचे नेमके कारण काय आहे जाणून घेऊयात. खालील समस्यांमध्ये होऊ शकतो गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स : इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), अन्न विषबाधा, अँझायटी, गॅस्ट्रायटिस, सेलिक डिसीज, इन्फ्लेमेटरी बाऊल सिंड्रोम (IBD), क्रोहन डिसीज याविषयी शहरातील डॉ. शांतनू कुलकर्णी यांनी सांगितले, इन्फेक्शन झाले असल्यास ही समस्या उद्भवू शकते. याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा पोटाच्या इतर समस्या असल्यासदेखील ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या तशी गंभीर नसते, इन्फेक्शनची औषधे घेऊन बरे वाटते. गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्सवर उपचारांची गरज तशी भासत नाही. मात्र वारंवार अशी समस्या उद्भवत असेल आणि या समस्येसह खालीलपैकी इतर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मळमळ, गॅस, ओटीपोटात दुखणे, शौचातून स्राव, डायरिया, मलावरोध. त्यांनी पुढे सांगितले...,खाल्ल्यानंतर संडास होणे हे अपचनाचे लक्षण आहे. अनेक दिवसांपासून पोटात साचलेला हा मळ असतो, जो काही खाल्ल्यानंतर लगेच बाहेर येतो. ज्यांना अॅसिडिटी असते, त्यांना याचा त्रास जास्त होतो आणि कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. तशी ही समस्या गंभीर नाही. मात्र जास्त दिवस ही समस्या असल्यास गंभीर होऊ शकते. अपचन होत असल्यास गॅस्ट्रायटिस होतो. याशिवाय आतड्यांना पीळ बसू शकतो. गुद््द्वाराच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शौचासह रक्त पडणे किंवा इतर लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...