आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडे स्वत:च्या प्राॅडक्टविषयी कहाणी आहे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) नुकत्याच झालेल्या प्रवासादरम्यान माझ्या नातेवाइकाने मला घामाघूम झालेले आणि थकलेले पाहिले. त्याने ताबडतोब ‘सिंपली डेट्स’ नावाचा खजुराचा बार आणला. तो एखाद्या चॉकलेट बारप्रमाणे दिसत होता म्हणून मी तो नाकारला. तेव्हा त्याने त्यामागची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. अमिरातीतून निर्यात केला जाणारा हा स्नॅक बार होता. तसा हा देश अमेरिकेतून होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून आहे. यूएईमध्ये खजुराचे २५० पेक्षा जास्त प्रकार आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या हंगामात तेथे उर्वरित वर्षासाठी दीड लाख टन खजूर उत्पादित होतो. खजूर दाखवून तो म्हणाला की, ‘ही शंभर कॅलरीची दुपारची न्याहरी आहे. यात सुकामेवा, अॅलर्जी निर्माण करणारे घटक किंवा दुग्ध उत्पादने किंवा ग्लूटन नाही.’ हे स्थानिक उत्पादन वैश्विक स्तरावर आणण्याचे कसे सुचले? असे विचारले असता त्याने मला श्रीलंकेच्या ३० वर्षीय युसूफ सलीम याची कहाणी ऐकवली. त्याचे वडील सलीम मोहंमद यांनी १९८८ मध्ये अल बराकाह ही खजुराची फॅक्टरी सुरू केली होती. दुबईला संधी देणारी भूमी का म्हणतात हे यावरून सिद्ध होते. पहिली पिढी आंत्रप्रेन्योरच्या रूपात समोर आली. सलीम मोहंमद हे यूएई, सौदी अरब, इराक, ट्युनिशिया आणि अल्जेरियाच्या फार्ममधून चांगल्या प्रकारचे खजूर मागवत असत आणि पॅकिंग करून बाजारात विकत असत. युसूफ यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असल्याने त्यांच्या ‘द डेट्स बार कंपनी’ने निर्यातीचा परवाना मिळवला. याशिवाय खजूर पेस्ट, सायरप, पावडर आणि साखर ही अन्य उत्पादनेही आणली. आज युसूफ यांच्या फॅक्टरीमधून दरवर्षी ६० हजार टनापेक्षा जास्त खजुरावर प्रक्रिया होते आणि विविध उत्पादने तयार करून जगातील ५४ देशांमध्ये निर्यात केली जाते. ही उत्पादने पर्यावरणाप्रति संवेदनशील असलेल्या बाजारात कशी विकली जातात ते पाहा. ही उत्पादने अशा फॅक्टरीत बनतात, जे कधी कार्बन फूटप्रिंट मागे ठेवत नाही. कारण त्यांचा प्रक्रिया कारखाना सौरऊर्जेवर चालवला जातो. दुबई इंडस्ट्रियल पार्कमध्ये असलेल्या या फॅक्टरीमध्ये १ मेगावॅट ऊर्जा निर्माण करणारे संयंत्र दीड लाख चौरस फूट जागेत पसरलेले आहे. यातून फॅक्टरीच्या वार्षिक गरजेच्या ४० टक्के वीज मिळते आणि त्याद्वारे १९ कोटींची बचत होते. यामुळे हवेत १०५८ टन कार्बनचे उत्सर्जन कमी होते. हे प्रमाण वर्षाला २२४ मोटारी रस्त्यावरून हटवल्याप्रमाणे आहे. हे उत्पादन पूर्णपणे सौरऊर्जेतून होते. पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणाऱ्या युवा पिढीला वाटते की, ते त्या बारवर निर्देशित केल्याप्रमाणे खरेच एखादा ‘कुल बार’ खात आहेत. अशा प्रकारे त्या खजुराच्या उत्पादनाबरोबर एक कहाणी ते बाजारात प्रस्थापित करतात आणि विकतात. त्यांच्याकडे मिनी बार आणि फुलसाइज बार अशी व्हरायटी आहे आणि प्रॉडक्ट लाइन शक्य तेवढी सरळ ठेवा हे ध्येयवाक्य आहे. म्हणजे तो जर ककाओ बार असेल तर त्यात ९० टक्के खजूर असेल आणि उर्वरित दहा टक्के ककाओ बिया असतील. युवा पिढी पर्यावरणाबद्दल तसेच निसर्गातून होणाऱ्या उपशाबद्दल संवेदनशील असताना अशी उत्पादने येत आहेत ही बाब येथे महत्त्वाची आहे.    

फंडा असा :  साधा प्लेन व्हॅनिला विकण्याऐवजी भावनात्मक कहाणीशी जोडलेले उत्पादन जादा विकले जाते.