आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बालक पालक'मधील डॉली आठवतेय का तुम्हाला! आता दिसते ग्लॅमरस, या मालिकेतून येतेय प्रेक्षकांच्या भेटीला  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  दिग्दर्शक रवी जाधव यांचा 2013 मध्ये आलेला ‘बालकपालक’ हा चित्रपट तुम्हांला आठवत असेलच. सेक्स एज्युकेशनवर भाष्य करणा-या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर यांच्यासह शाश्वती पिंपळीकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. शाश्वती पिंपळीकर हिने या चित्रपटात डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती.  हा चित्रपट केला तेव्हा शाश्वती नववीत शिकत होती. 16 नोव्हेंबर 1996 रोजी पुण्यात जन्मलेली शाश्वती आता लवकरच 23 वर्षांची होणार आहे. सध्या ती काय करतेय जाणून घेऊयात.. 

मुळची पुण्याची आहे शाश्वती... 
शाश्वती पिंपळीकर हीचा जन्म पुण्यात झाला असून ती लहानाची मोठी पुण्यातच झालेली आहे. तिने तिचे प्राथमिक शिक्षण रोसरी हायस्कुल मधून पूर्ण केले असून फर्ग्युसन कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले आहे. बालपणापासूनच  तिने नाटकात काम करायला सुरुवात केली. सातवीत असताना तिने रंगभूमीवर ‘रायगडला जेव्हा जग यते’ या नाटकात काम केले. तर आठवीत असताना तिला ‘बंध रेशमाचे’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेत तिने केवळ 4 महिने काम केले होते. काही दिवसांनी तिला बालक पालक चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटासाठी स्क्रिन टेस्ट दिल्यानंतर लगेचच तिची निवड झाली. बालक पालक हा शाश्वतीचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट  आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला, असे शाश्वती सांगते. 

आजी-आजोबांनी दर्शवला होता विरोध
एका मुलाखतीत शाश्वतीने सांगितले होते की, माझे आजी-आजोबा सुरुवातीला या चित्रपटात मी काम करु नये या मताचे होते. चित्रीकरणासाठी मी पुण्याहून मुंबईला कसे जाणार, या काळजीपोची ते मला विरोध करीत होते. मात्र नंतर त्यांनी माझ्या अभिनय गुणांना संधी मिळणार असल्याने बिनशर्त पाठिंबा दिला. 

'बालक पालक' नंतर केल्या टीव्ही मालिका...   
बालक पालक या चित्रपटानंतर शाश्वतीने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘चाहूल’ या टीव्ही मालिका केल्या. तिने ‘देहभान’ या नाटकामध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यानंतर तिने ‘मधु इथे चंद्र तिथे’, ‘हेडलाईन’ या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.

कथ्थक नृत्यांगणा आहे शाश्वती... 
शाश्वती एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. तिने कथ्थक नृत्याचे धडे गिरवले आहेत. याशिवाय ती गणेशोत्सवाच्या काळात ‘कलावंत ढोलताशे’ या पथकात ढोल वादक आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती यात सहभागी होत आहे. 

सध्या 'सिंधू' मालिकेत झळकत आहे...
सध्या शाश्वती फक्त वाहिनीवर प्रसारित होणा-या सिंधू या मालिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या ऑडिशनवेळी शाश्वती आजारी होती, त्यामुळे ती ऑडिशनला उपस्थित राहू शकली नव्हती. मात्र क्रिएटिव्ह हेडच्या सांगण्यावरुन तिने त्यांना ऑडिशनसाठी एक व्हिडिओ पाठवला आणि लगेचच दुस-या तिस-या दिवशी तिची या मालिकेसाठी निवड झाली. या मालिकेत शाश्वती पारंपरिक रुपात झळकत आहे.