आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाज पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते डॉक्टर आणि नर्स..अचानक दोन्हीही झाल्या अदृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्की- तुर्कीतील एका शहरातील हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. कामकाज पूर्ण केल्यानंतर महिला डॉक्टर आणि नर्स हॉस्पिटलबाहेर पडत्या. रस्त्याच्या कडेला उभे राहून दोन्ही निवांत गप्प्पा मारत होत्या. तितक्यात अचानक दोन्ही अदृश्य होतात. हा सर्व प्रकार हॉस्पिटल बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

 

मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, डॉ.सुजाण बलिक आणि ओजले डुमाज असे अदृश्य झालेल्या डॉक्टर आणि नर्सचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की,  अचानक हादरा बसतो. दोघींच्या पायाखालची जमीन सरकते. दोघी अचानक सिंकहोलमध्ये पडून अदृश्य होतात.       

 
बचावासाठी ​धावतात लोक 
ही घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडते. लोकांमध्ये भीती पसरते. काही लोक अचानक अदृश्य झालेल्या महिलांच्या मदतीला धावतात. एवढी मोठी घटना घडून दोन्ही महिला किरकोळ जखमी होतात, याचा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.

 

पोलिस यंत्रणा ही घटनेच्या तपासात 
अचानक जमीन अदृश्य होण्याच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे, जमिनीखाली वाहते पाणी असल्याने मातीचा ढीग कोसळला असावा, असा अंदाज  तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...