आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन थिएटरमध्ये नर्ससोबत आपत्तिजनक परिस्थीत डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन(मध्य प्रदेश)- जिल्हा रूग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ.राजू निदारियाचा ऑपरेशन थिएटरमध्ये स्टाफ नर्ससोबत आपत्तिजनक परिस्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रविवारी सोशल मेडीयावर सगळीकडे पसरला गेला. या घटनेनंतर कलेक्टरांच्या आदेशावरून सीएमएचओने डॉ. निदारिया यांना सिव्हील सर्जन पदावरून हकलले. आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी तपासचे आदेश दिले आहेत.

 

व्हिडीओ जिह्ला रूग्णलयाच्या मुख्य बिल्डींगमधला आहे. यात डॉ.निदारिया नर्स स्टाफला किस करताना दिसत आहेत. व्हिडीओ स्टाफ नर्सच्या नावाने असलेल्या वॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला, आणि नंतर सगळीकडे पसरला. कलेक्टर शशांक मिश्रा यांना या व्हिडीओबद्दल कळाल्यावर त्यांनी सीएमएचओ डॉ. एम.एल. मालवीय यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सीएमएचओ डॉ. मालवीय म्हणाले- प्रकरणाची चौकशी होईल, नर्सविरूद्धदेखील कारवाई केली जाईल. 


याआधीही आल्या तक्रारी
डॉ. निदारिया अॅनेस्थेशीया स्पेशॅलीस्ट आहेत. त्यांच्याविरूद्ध याआधिही स्टाफ नर्सने तक्रारी दिल्या आहेत. या घटनेपासून डॉ. निदारिया यांचा फोन बंद आहे.

 

घटना अतिशय निंदणीय आहे, याची सखोल चौकशी करून दोषींवर करवाई करण्यात येईल.
- तुलसी सिलावट, आरोग्य मंत्री

 

बातम्या आणखी आहेत...