आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपने उतरवला विलासराव देशमुखांचा जावई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- नुकतंच काँग्रसने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. यात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून उमेदवारी मिळाली. त्यानंतर आज भाजपनेही आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांये जावई डॉ. अतुल भोसले उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांचे जावई अशी रंगतदार लढत होणार आहे.डॉ. अतुल भोसले हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या कन्येचे पती आहेत. शिवाय डॉ. भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. ते सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर "त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो", अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात केली होती. आज भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली

बातम्या आणखी आहेत...