आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Doctor Checks Dead Patients Facebook Account Before Giving Bad News To Their Parents Because Of Shocking Reason

रुग्णाचा मृत्यू होताच त्याची फेसबूक प्रोफाइल शोधायला लागायचा डॉक्टर, त्यानंतरच कुटुंबीयांना देत होता वाईट बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - येथील इंडियानापोलिसमधील एका डॉक्टरने त्यांच्या खुलाश्याने सर्वांना धक्का दिला आहे. पेशंटचा मृत्यू झाल्यास  डॉक्टर फेसबूकवर त्याची प्रोफाइल शोधू लागायचा आणि त्यानंतरच नातेवाईतांना ही वाईट बातमी द्यायचा असे त्यांने स्वतः सांगितले आहे. प्रत्येकवेळी मृताच्या आई वडिलांना ही वाईट बातमी देण्याआधी हे करायचा असे डॉक्टरांनी सांगितले. लोकांनी त्याला यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने भावून होत त्याची स्टोरी सांगितली. 


डॉक्टर लुईस प्रोफेटा यांनी लिहिले, आम्ही जेव्हाही हॉस्पिटलमध्ये एखाद्या तरुण व्यक्तीला वाचवण्यात अपयशी ठरतो तेव्हा तेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या आई वडिलांना न देता आधी त्याचे फेसबूक अकाऊंट शोधू लागायचो. डॉक्टरने सांगितले की, ते मृत्यूनंतर मृताच्या फेसबूक प्रोफाइलवर त्यांच्या भावना व्यक्त करॉायचे. मृताच्या नावाने ते एक पत्र लिहायचे. त्यात ते लिहायचे, मी तुझ्या आई वडिलांना काहीही सांगितलेले नाही, पण आता पाच मिनिटांनी त्यांचे आयुष्य बदलून जाईल. ते पूर्वी जसे हसायचे तसे पुन्हा हसू शकणार नाहीत. खरं सांगायचे तर तू फक्त एक निर्जीव शरीर आहेस. ओल्या पेपरच्या ढिगाऱ्यासारखा, आम्ही तुला वाचवण्यासाठी अनेक सुया टोचल्या पण आता तुझ्यामध्ये काहीही शिल्लक नाही. तू शांत आहेस. 


बरं आहे तू हे पाहू शकणार नाहीस 
डॉक्टरने लिहिले मी हे तुला यासाठी लिहितोय की, तुला समजणार नाही असे बरेच काही आहे. हे सर्व पाहायला तू नसशीस हे चांगलेही आहे. कारण मी तुझ्या कुटुंबीयांना ही बातमी देताच त्यांच्यावर आभाळ कोसळेल. बरं झालं तू तुझ्या वडिलांना रडताना पाहू शकणार नाहीस. 


मला दुःख वाटून घेता यावे 
डॉक्टर लुईसने पुढे लिहिले, मी यासाठीही ही प्रोफाइल चेक करतो की, मला तुला समजूत घेता यावे. तुझ्या कुटुंबाने नेमके काय गमावले याची जाणीव मला व्हावी. तू फोटोत किती आनंदी दिसत आहेस. आईबरोबरच्या फोटोमध्ये चेहऱ्यावरील हसू किती छान आहे. तुझी मित्रांबरोबरची बीचवरील मस्ती... पण आता असे होऊ शकणार नाही.. तुला असे करता येणार नाही. 


सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल 
डॉक्टर लुईस यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या या अत्यंत प्रभावी आणि भावूक करणाऱ्या सत्यामुळे लोकांना हादरवून सोडले आहे. लोक डॉक्टर लुईसचे प्रचंड कौतुक करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...