आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादात डॉक्टर मुलीने केली पित्याची हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला : बाप-लेकीच्या भावनिक नात्याला तडा देणारी घटना गुरुवारी रात्री उशिरा रिजनल वर्क शॉपच्या मागील परिसरात घडली. एका डाॅक्टर मुलीने पित्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला. या घटनेला संपत्तीच्या वादाची िकनार असल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. बाबुराव कंकाळ असे मृत पित्याचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मुलगी रेश्मा बाविस्कर िहला ताब्यात घेतले आहे.

प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे साईनाथ नगरमध्ये बाबुराव कंकाळ कुटुंबासह राहत. त्यांच्या कुटुंबात मुलगा सुरज, पत्नी अाणि विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर अादींचा समावेश अाहे. रेश्माचे लग्न २०१५मध्ये झाले हाेते. मात्र काही दिवसांपासून रेश्मा माहेरीच हाेती.

अशीही शक्यता... 
रेश्मा व बदलापूर येथील प्रशांत बाविस्कर हे मे २०१५मध्ये विवाहबद्ध झाले. काही िदवसांनी ती माहेरी अकाेल्यात अाली. तिने रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणूनही काम सुरू केले होते. त्यानंतर पती प्रशांत बाविस्करही अकाेल्यात अाले. मात्र दाेघांमध्ये वाद सुरू झाले हाेते. याचा घटनेशी संबंध पोलिस तपासत आहेत.