आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधकाने बनवली होती वेदना न देता मारणारी Suicide Machine; 10 हजार लोक झाले वापरण्यास तयार; बंदीसाठी जगभरातून खटले दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियातील एका वादग्रस्त संशोधकाने असा शोध लावला होता की त्याचा विरोध करण्यासाठी जगभरातून याचिका दाखल करण्यात आल्या. डॉ. फिलिप असे त्या संशोधकाचे नाव असून त्याने 2015 मध्ये एक सुसाइड मशीन तयार केली होती. जगभरात त्याचा इतका विरोध झाला. तरीही तो शेवटपर्यंत आपला आविष्कार योग्य असल्याचे ठरवत होता. त्याने खास आत्महत्येसाठी ही मशीन बनवली होती. आत्महत्या करण्यासाठी इच्छुक असलेल्याने याचा वापर केल्यास शरीराला मरताना काहीच वेदना होत नाहीत असा दावा त्याने केला. 


फिलिपने आपल्या मशीनला डेस्टिनी असे नाव दिले होते. सोबतच आपल्या मशीनमध्ये कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाही असा दावा त्याने केला. फिलिपने सांगितल्याप्रमाणे, या मशीनमध्ये 91% नायट्रोजन आणि 9% कार्बन मोनॉक्साइड गॅसचा वापर करण्यात आला. एक बटन दाबताच विषारी वायूचा थेट नाकात प्रवेश होईल. यानंतर अवघ्या काही सेकंदात कुठल्याही वेदनेशिवाय त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. ही मशीन बनवल्यानंतर फिलिपने त्याची प्रदर्शिनी आणि एक कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांनी वाढत्या तक्रारींवरून त्या मशीनवर कायमची बंदी लावली. त्याचा विरोध करणाऱ्यांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर संशोधकांचाही समावेश होता. 


10 हजार लोक वापरण्यासाठी होते इच्छुक
डॉ. डेथ नावाने कुप्रसिद्द असलेल्या डॉ. फिलिपचे एक सुसाइड क्लब आहे. यात 10 हजार सदस्य आहेत. या ग्रुपच्या सदस्यांना सतर्कतेने आत्महत्या कशी करावी याचे धडे दिले जातात. डॉक्टर डेथने सांगितल्याप्रमाणे, हा निर्णय त्यांचा आहे. त्यांना जगायचे की मरायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, मुळात कुणालाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. त्यावर डॉक्टरचे उत्तर विचित्र होते. "आत्महत्येसाठी माझे मशीन खरेदी करू नये यासाठी बंदी लावली जात आहे. परंतु, लोक बाजारातून गळफास घेण्यासाठी दोऱ्या सुद्धा विकत घेतात. त्या विकण्यासाठी कोणाला जबाबदार धरणार आहात?" ऑस्ट्रेलिया प्रशासनाने या डॉक्टरला दिवाळखोर ठरवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...