आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेकडो मुलींचा गुन्हेगार आहे हा डॉक्टर, 7 वर्षांत केल्या 5 हजारांहून अधिक गर्भलिंग चाचण्या आणि कित्येक भ्रूणहत्या; 100 कोटींची संपत्ती असूनही पैशांसाठी करत होता हे कुकृत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जोधपूर : स्त्रीयांची भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ.मोहम्मद इम्तियाज रंगरेज (41 वर्ष) ला पोलिसांनी हिस्ट्रीशीटर डॉक्टर म्हणून घोणित केले आहे. एखाद्या डॉक्टरला हिस्ट्रीशीटर घोषित करण्याचे बहुतेक देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. इम्तियाजवर मागील 7 वर्षात जोधपूर जिल्ह्यात 5 हजार भ्रूण लिंग परिक्षण करण्याचा आरोप आहे. जोधपूरच्या नागौरी गेट पोलिस ठाण्याचा हिस्ट्रीशीटर घोषित केले आहे. 

 

डॉ.इम्तियाजला सर्वप्रथम 2016 मध्ये लिंग तपासणी करताना रंगेहात पकडले होते. त्यावेळी तो बालेसर येथील सीएचसीचा प्रभारी होता. या अपराधामुळे त्याला निलंबित करण्यात येऊन तुरूंगात पाठविण्यात आले होते. पण तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा भ्रूण लिंग तपासणी करण्याचे सत्र सुरू केले. डॉ.इम्तियाजला चारवेळेस या प्रकरणात वेगवेगळ्यावेळी अटक झालेली आहे. डॉ.इम्तियाजचे वडील डॉ.नियाज हे सुद्धा या पापात सहभागी होते. 

 

2016 झाली होती प्रथम  अटक 

 

प्रथम वेळ : बालेसर सरकारी रूग्णालयात इंचार्ज पदावर कार्यरत असतांना 7 ऑक्टोबर 2016 रोजी डॉ.इम्तियाज त्याच्या मित्र भैरवसिंहच्या घरी गर्भलिंग चाचणी करताना रंगहाथ पकडल्या गेला होता. यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. 

 

दूसरी वेळ : 21 मे 2017 रोजी इम्तियाजला त्याचा दलाल हनुमान ज्याणीच्या घरातून अटक करण्यात आली होती. येथे त्यांनी एका गर्भवतीला बोलाविले होते आणि लिंग चाचणी करून मुलगी असल्याचे सांगितले होते. 

 

तिसरी वेळ : 5 जानेवरी 2018 रोजी इम्तियाजच्या टोळीने एका गर्भवतीला अगोदर झुंझुनूं नंतर सीकर, मग नागौर आणि शेवटी जोधपुरला बोलविले होते. रेल्वे स्टेशनजवळ चालत्या गाडीत त्याने त्या महिलेची तपासणी केली होती. पण तरीही तो आणि त्याची टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली होती. 

 

चौथी वेळ : 9 सप्टेंबर 2018 रोजी डॉ.इम्तियाज त्याचा दलाल साथीदार फतेहकिशनसोबत महामंदिर जवळील एका घरात गर्भवतीची भ्रूण तपासणी करताना रंगेहाथ पकडला होता. पण त्याचा खास दलाल हनुमान ज्याणी यावेळी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. 


गर्भपातासाठी पिता देखील आहे कुख्यात 

मोहम्मद इम्तियाज आणि त्याचे वडील डॉ.नियाज रंगरेज दोघेही भ्रूण तपासणी करून गर्भपात करणारे कुख्यात डॉक्टर होते. भ्रूण चाचणीसाठी 25 ते 30 हजार आणि गर्भपात करण्यासाठी तितकेच विशेष पॅकेज घेत होते. इम्तियाज बरोबर त्याचे वडील सुद्धा 2012, 2014 आणि 15 ऑगस्ट 2016 रोजी गर्भलिंग चाचणी करताना रंगेहाथ पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

 

100 कोटींची संपत्ती, तरीही पैशांची हाव

इम्तियाजला 2016 मध्ये पहिल्यांदा लिंग परीक्षण करताना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो निलंबित आहे. यानंतर त्याला पुन्हा तीनवेळेस अटक करण्यात आली होती. पण आरोग्य विभागाने त्याला बडतर्फ करण्यासाठी कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही. डॉ.इम्तियाजकडे निता नियाज येथील मकराना येथे हॉस्पीटल तसेच जोधपूरसह इतरही शहरांमध्ये घरे आणि जमीन आहे. तो जवळपास 100 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक असल्याचे सांगितले जात आहे. 


आता पोलिस ठेवणार नियमित नजर 

इम्तियाज आता पोलिसांच्या संकेतस्थळावर हिस्ट्रीशीटर म्हणून दाखविण्यात आला आहे. पोलिसांनी कधीही बोलविले तर त्याला तेथे हजर राहावे लागणार आहे. पोलिस त्याच्या घराची वेळी दरवेळी झडती देखील घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचा अपराधी रेकॉर्ड असेल तर तो व्यक्ती समाजासाठी धोका निर्माण होतो. यामुळे समाजहित लक्षात घेता त्या व्यक्तीवर पाळत ठेवणे आवश्यक मानले जाते. अशावेळी पोलिस त्या व्यक्तीविरोधात हिस्ट्रीशीट सुरू करतात.