आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctor Declared The Barnala Youth Dead But While Funeral He Was Found Him Alive In

15 वर्षीय मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर म्हणाले - बॉडी घरी घेऊन जा; अंत्यसंस्काराची तयारी करताना घडले असे काही की, कुटुंबीयांना फुटला घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बरनाला (पंजाब)  : चंडीगड येथील PGI रूग्णालयातील डॉक्टरांनी एका रूग्णास मृत घोषित केले होते. पण 8 तासांनंतर तो युवक पुन्हा जिवंत झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले. पण अंत्यसंस्काराची तयार करताना 15 वर्षीय गुरतेज सिंहचा जीव परत आला. घडलेला प्रकार पाहताच कुटुंबीय हैराण झाले पण त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण कुटुंबीयांनी आता पीजीआयच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावत कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


- पक्खोकलां गावातील रहिवासी सिंगारा सिंग यांच्या 15 वर्षीय गुरतेजची डोळ्याची दृष्टी कमी झाल्यामुळे त्याला भटिंडा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी त्याला निओप्लाझम आजार सांगत डीएमसी लुधियाना आणि पीजीआय चंडीगड येथे जाण्यास सांगितले.  

- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरतेजला चंडीगड येथील पीजीआय रूग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी 11 जानेवारी रोजी त्यास मृत घोषित केले. पण मुलाचे मृत्यूप्रमाणपत्र दिले नव्हते. अशातच ज्या डॉक्टरने गुरतेजला मृत घोषित केले त्याचे नाव कुटुंबीयांना माहीत नव्हते.  

आणि मग अचानक उघडले डोळे

- डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर घरात गुरतेजच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्याचे कपडे बदलत असताना शेजारी सतनाम सिंगला गुरतेजच्या हृदयाची धडधड सुरु असल्याचे भास झाला. त्यानंतर तत्काळ केमिस्टला पाचारण करण्याल आले. 

 

- नंतर तो जिवंत असल्याचे माहीत झाले. त्याचे ब्लडप्रेशर देखील नॉर्मल होते. दरम्यान गुरतेजने डोळे उघडून बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला घेऊन सिव्हील हॉस्पिटल गाठले. येथील डॉक्टरांनी त्यास तपासले असता तो जिवंत असल्याचे आढळले आणि त्याला फरीदकोट येथील बाबा फरीद मेडीकल कॉलेज आणि रूग्णालय रेफर केले. 

 

मुख्यमत्र्यांकडे केली कारवाईची मागणी, उपचारावर खर्च झाले 4 लाख रूपये
सिंगारा सिंगने सांगितले की, गुरतेज त्यांच्या एकुलताएक मुलगा आहे. ते व्यवसायाने शेती करतात. त्यांना मुलाच्या उपचारावर आतापर्यंत 4 लाख रूपये खर्च आला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...