आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने एकत्रच दिला 3 मुलांना जन्म, पण दोन मुले विचित्र थैलीत पोटाबाहेर आली, 7 मिनिटे डॉक्टर होते स्तब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाउलो - ब्राझीलमध्ये महिलेने एकत्र तीन मुलांना जन्म दिला. ऑपरेशनच्या माध्यमातून डिलिव्हरी करण्यात आली. पहिल्या मुलाना जन्म सामान्य होता, परंतु जेव्हा दुसऱ्या आणि तिसरा मुलगा बाहेर आला तेव्हा ते एका पॉलिथिनसारख्या आवरणात होते. डॉक्टर आणि इतर स्टाफसाठी हा एकदम नवा आणि पहिला अनुभव होता. यात तिसरा मुलगा तर या थैलीत तब्बल 7 मिनिटांपर्यंत झोपून होता. आणि डॉक्टरांसाठी तोपर्यंत कोणताही निर्णय घेणे खूप कठीण झाले होते. डॉक्टरांच्या मते, अशी एखादी घटना आयुष्यात एकदाच पाहायला भेटते.

 

अॅम्नियॉटिक सॅकसोबत जन्मली मुले
- ही घटना साओ पाउलोची आहे, येथे डॉक्टर रॉड्रिगो फिल्हो ऑपरेशन करून एका महिलेचे डिलिव्हरी करत होते. महिलेने एकत्र 3 मुलांना जन्म दिला.
- यात एका मुलाचा जन्म तर नॉर्मल झाला होता, परंतु इतर दोन मुले एका आवरणासोबत जन्मली होती. याला अॅम्नियॉटिक सॅक म्हणतात. 
- डॉक्टरांच्या मते, सर्वसाधारणपणे असे आवरण बाळ जन्मताच पोटातच निघून जाते, पण या प्रकरणात असे झाले नाही.
- डॉक्टर म्हणाले की, पहिला मुलगा जाओक्विम अॅम्नियॉटिक सॅकसोबत पोटाबाहेर आला, परंतु बाहेर येताच त्याची ही सॅक फुटली आणि ते मुक्त झाले.
- मग सर्वात शेवटी त्याची बहीण अॅडलिन बाहेर आली तेव्हा तीही अॅम्नियॉटिक सॅकने कव्हर होती. पोटातून बाहेर आल्यानंतरही ती गाढ झोपेत होती. 
- बाहेर आल्यानंतर ती याच सॅकमध्ये 7 मिनिटे झोपलेली होती. दुसरीकडे, तिला पाहिल्यानंतर डॉक्टर आणि नर्सला तिची झोप लगेच मोडावीशी वाटली नाही. 
- डॉ. रॉड्रिगो म्हणाले की, आम्ही अशा प्रकारची सॅक कापून तिची झोपमोड करू इच्छित नव्हतो. आम्ही सावकाश ती जागी होण्याची वाट पाहत होतो.
- मुलगी झोपेतन उठली तेव्हा तिची अॅम्नियॉटिक सॅक कापण्यात आली आणि मग तिला तिच्या आईजवळ दोन भावांसोबत झोपवण्यात आले.

 

80 हजारांत घडते एखादी घटना
- डॉक्टर आणि मेडकिल स्टाफसाठी हा एकदम नवा अनुभव होता. त्यांना एकत्रच दोन मुले अॅम्नियॉटिक सॅकसोबत जन्मलेले पाहण्याची संधी मिळाली, जी खूप दुर्मिळ आहे.
- 80 हजारांत अशी एखादीच घटना पाहायला मिळते. आणि तीही जेव्हा एखादी मुदतपूर्व प्रसूती असेल तेव्हाच. 
- तथापि, डॉक्टरांनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचे ठरवले. व्हिडिओत डॉक्टर आणि त्यांची टीम मुलीला गोंजारताना दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...