आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेची प्रसूती होत असताना अचानक थांबले डॉक्टरांचे हात, तिथे जे घडले ते पाहून शॉक्ड झाला पूर्ण स्टाफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लँडेल - अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान असे काही घडले, जे पाहून हॉस्पिटलच्या स्टाफसोबतच संपुर्ण जग हैराण झाले. सिजेरियन डिलीवरीदरम्यान डॉक्टरांचे हात अचानक थांबले, कारण त्यांचा बोट कुणीतरी पकडला होता आणि हे काम दुसरे कुणी नाही तर गर्भातील बाळाने केले होते. हे पाहून सर्वच लोक शॉक्ड झाले होते. मुलीच्या पित्याने हे मोमेंट कॅमेरात कैद केले होते, जे जगभरात व्हायरल होत आहे.


गर्भातून येताच मुलीने पकडला डॉक्टरांचा बोट...

> अमेरिकेच्या ग्लँडेल शहरात राहणा-या रँडी अटकिंस आणि त्याची बायको एलिसियाची ही स्टोरी आहे. अक्टोबर 2012 मध्ये प्रेग्नेंसी पीरियड पुर्ण झाल्यानंतर एलिसिया डिलीवरीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. 
> डॉक्टरांनी नॉर्मल डिलीवरीला नकार दिल्यानंतर सीजेरियन डिलीवरी करण्यात आली. यादरम्यान डॉक्टर्स आपले काम करत होते, तेव्हा जे घडले ते पाहून डॉक्टरांचे हात थांबले आणि तेथील सर्वच लोक चकीत झाले. 
> ऑपरेशनदरम्यान मुलीचा हात बाहेर आल्याबरोबर तिने डॉक्टरांचा बोट पकडला. हे पाहून सर्व स्टाफ हैराण झाले. डॉक्टरांनी तात्काळ महिलेच्या पतीला बोलावले. त्याने मधे येताच हे मोमेंट कॅमेरात कैद केले. 


महिला आणि तिच्या पतीने सांगितली ही स्टोरी 

> मुलीचे वडील रँडी म्हणाले, "डॉक्टरांनी मला फोन करुन सांगितले की, ती माझा बोट पकडत आहे. हे ऐकून मी पळतच तिथे पोहोचलो आणि ते पाहून चकीत झालो. मी तात्काळ तो क्षण कॅमेरात कैद केला. हा अद्भुत फोटो होता."
> तर मुलीची आई एलिसियाने सांगितले की, "डिलीवरीदरम्यान डॉक्टरांनी माझ्या पोटाची पिशवी उघडून पाणी काढले, तेव्हा माझ्या मुलीचा हात बाहेर आला आणि तिने डॉक्टरांचा बोट पकडला. यानंतर माझ्या पतीने येऊन ही स्पेशल मोमेंट कॅमेरात कैद केली."
> महिलेनुसार या घटनेवर डॉक्टर आठवाभर बोलू शकले असते. डॉक्टरांनी स्वतः या फोटोची प्रिंट काढली होती. एलिसिया स्वतःही एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि हे कपल स्वतः फोटो स्टूडियो चालवते. 
> त्यांनी आपल्या मुलीचे नाव नेवाह ठेवले. याचा अर्थ स्वर्ग असा होतो. नेवाह आपल्या घरात सर्वात लहान आहे. तिच्यापेक्षा दोन मोठे बहीण-भाऊ आहेत. 

बातम्या आणखी आहेत...