आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाचा अर्ज फेटाळला म्हणून 6 वर्षांच्या मुलीला घेऊन पतीच्या घरी गेली पत्नी, पोहोचताच दिसली सवत, पाहता-पाहता सुरू झाले महाभारत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- एका डॉक्टरने दुसरी बायको, आई आणि इतर लोकांसोबत मिळून पहिल्या बायकोवर आणि तिच्या दोन भावांवर काठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. नवऱ्याने न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे श्वेता गुरुवारी आपल्या 6 वर्षांच्या मुलीला घेऊन दोन भावांसोबत तिच्या सासरी गेली होती. पोसिसांनी आरोपी नवरा, सासू, दुसरी बायको आणि इतर मारहाणीत सामील असलेल्या व्यक्तींविरुद्ध जिवे मारण्याचा गुन्हा नोंदवला असून सासू आणि दुसऱ्या बायकोला सोडून इतर सगळ्यांना अटक केली आहे.

 

बायको गेली होती माहेरी, नवऱ्याने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

श्वेता परमारचे लग्न जून 2010 मध्ये डॉ. सुभाष परमार यांच्यासोबत झाले होते. ते दोघे दोन वर्षे सोबत राहिले, त्यादरम्यान त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर सासू आणि नवरा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. त्यामुळे श्वेता तिच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर सुभाषने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

 

काठ्यांनी केली जबर मारहाण
काही दिवसांनंतर श्वेताला कळाले की सुभाषने दीप्ती नावाच्या मुली सोबत दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे ती तिच्या दोन भावांसोबत सुभाषच्या घरी गेली. तिथे श्वेता आणि दीप्ती यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुभाष, त्याची आई आणि दीप्तीने इतर काही लोकांसोबत मिळून श्वेता आणि तिच्या भावाला मारहाण सुरू केली. श्वेता आणि तिच्या भावांवर काठ्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून सुभाष आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...