आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपात रॅकेटमधील डॉक्टर नइमोद्दीन शेखची पदवी बोगस, कन्नड तालुक्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचेही नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिसांचा तपास जसा पुढे जातोय, तसे बेकायदा गर्भपात रॅकेट प्रकरणात अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. बेकायदा गर्भपाताच्या संशयावरून अटक केलेला डॉ. नइमोद्दीन रफिक शेख (४८, मूळ रा. अंबड, ह.मु.रोशन गेट) याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे. तो रोशन गेट येथे न्यू लाइफ हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


बोगस पदवीच्या अाधारे शेख अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत लोकांच्या जीवनाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तो बेकायदा गर्भपातासारखे घातक कृत्य करत असल्याचे अनेक पुरावेही पोलिसांच्या हाती आले आहेत. २९ जानेवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस जांभळे यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्यासोबत अटक केलेला डॉक्टर सुनील बाळासाहेब पोते (५७) आणि राजेंद्र काशीनाथ सावंत (रा. मयूर पार्क) यांची पोलिस कोठडीही ५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 

 

या रॅकेटमधील टोळी १५ हजारांत गर्भलिंग निदान, तर २५ हजारांत भ्रूणहत्या करत असल्याचे समोर आले आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील वैद्यकीय अधिकारी वर्षा राजपूत शेवगण हिचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...