आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सच्या भांगेत कुंकू भरून डॉक्टर म्हणाला- \'आता आपले लग्न झाले, पण कुणाला सांगू नकोस\' मग वर्षभर लुटत राहिला अब्रू; प्रेग्नंट होताच केले बळजबरी अबॉर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर (बिहार) - जेएलएनएमसीएचच्या ए-ग्रेड नर्सने पीजी सर्जरी विभागाच्या सेकंड इयरचा विद्यार्थी डॉ. विवेक कुमारवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आणि बळजबरी गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला आहे. नर्सने बरारी पोलिस ठाण्यात डॉ. विवेक आणि त्याच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडिता जिल्ह्याच्या एका गावातील रहिवासी आहे, तर आरोपी मसौढी, पाटण्याचा रहिवासी आहे. सध्या तो वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या पीजी हॉस्टेलमध्ये राहतो. बरारी पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पीडित नर्स महादलित आहे. आरोपी वर्षभरापासून तिचे लैंगिक शोषण करत होता. 


रिटायर एसपीचा फ्लॅट किरायाने घेऊन बनवले संबंध 
नर्सचा आरोप आहे की, डॉ. विवेकने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आकाशवाणी रोडवरील निवृत्त एसपी राजेंद्र रजक यांचा फ्लॅट किरायाने घेतला आणि रूममध्येच तिच्या भांगेत कुंकू भरले. डॉक्टर म्हणाला की, आता आपले लग्न झाले, पण कुणाला काहीच सांगू नकोस. जोपर्यंत माझ्या घरचे तयार होत नाहीत. तेव्हापासून नर्ससोबत आरोपी डॉक्टर पती-पत्नीप्रमाणे राहू लागला. यादरम्यान नर्स गर्भवती झाली तेव्हा डॉक्टरने औषध खाऊ घालून तिचा गर्भपातही केला. नर्सने विरोध केल्यावर म्हणू लागला की, मला आणि माझ्या आईला हुंडा पाहिजे. हुंडा दिलास तरच लग्न करेन. 

 

डॉक्टरची आई, भाऊ आणि एडीएम नातेवाइकावरही धमकी दिल्याचा आरोप

आरोपी डॉक्टरने आई आणि भावाच्या दबावात येऊन 31 नोव्हेंबर 2018 पासून नर्ससेाबत राहणेही सोडून दिले. नर्सचा आरोप आहे की, डॉ. विवेकची आई म्हणाली की, दोघांची जात वेगवेगळी आहे. मुलगा डॉक्टर आहे, काहीही झाले तरी त्याचे नर्सशी लग्न होऊ देणार नाही. डॉ. विवेकचा भाऊ डॉ. विक्रम कुमार पीएमसीएच पाटण्यात मेडिसिन विभागात कार्यरत आहे, तर त्याचा मेहुणा सुनील कुमार स्वत:ला एडीएम असल्याचे सांगून मला जिवे मारण्याची धमकी देत आहे. आरोपी डॉक्टर दुसऱ्या जागेवर लग्न करण्याची तयारी करत आहे. नर्स काही दिवसांपूर्वी डॉ. विवेकच्या होस्टेलमध्ये लग्नाबद्दल विचारायला गेली, तर तिला शिवीगाळ करण्यात आली.


 

 

बातम्या आणखी आहेत...