आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदाताच अचानक गेला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘डॉक्टर’ एक सेवाभावी धर्म जोपासणारा पेशा व पदवी घेताना जी शपथ घ्यावी लागते तिचे पालन करणारे डॉक्टर्स आहेत, त्यापैकी मला डॉ. रोहित शहा नावाचे एक मित्र भेटले. गेल्या 35-40 वर्षांपासून हृदयरोग तज्ज्ञ म्हणून नाशिकमधील प्रसिद्ध डॉ. रोहित शहा यांनी लाखो लोकांना वैद्यकीय सेवा दिली. हजारोंना मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले. मानव सेवेचे व्रत हाती घेऊन गरीब असो किंवा श्रीमंत याचा विचार न करता, रुग्णाला रोगापासून मुक्ती दिली. हेच त्यांच्या जीवनाचे पहिले ध्येय राहिले. आयुर्वेद महाविद्यालय, एच. ए. एल. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर जीवनाच्या अंतापर्यंत त्यांनी रुग्णसेवा सोडली नाही. 1980 मध्ये पत्नीस अ‍ॅटॅक आला, बर्डे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तेव्हा पेशंटला भरती करून उपचार करीत. रोग सर्वसामान्यांना अवघडच जात असतो. तेव्हा खांद्यावर हात ठेवून सांगत की, घाबरू नकोस, खर्चाची चिंता सोड. आपण कॉलेजपासून मित्र आहोत. बिल सवडीने दे. याने दिलासा तर मिळत होताच, पण पत्नीचे अर्धे दुखणे बरे झाले. 2010 मध्ये मला अ‍ॅटॅक आला, तेव्हा डॉ. रोहितनी प्रयत्नांची शिकस्त करून मला आराम मिळवून दिला. मृत्यूची वेदना काय असते, याचा अनुभव पेशंटला त्या वेळी येतो. डॉ रोहित शहाच्या अचानक निधनाने मी व माझ्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शेवटचे दर्शन घेताना मुखातून अचानक शब्द आले, हे रे काय? मित्रा असा अचानक महाप्रवासाला निघून गेलास. असह्य वेदना देऊन! मित्रत्वाचे नाते संकटसमयी उपयुक्त ठरते, पण जिवाभावाचा मित्र महायात्रेस निघून जातो तेव्हा होणार्‍या वेदना असह्य असतात. अनेक रूग्णांना जीवदान करणार्‍या डॉक्टर रोहित शहा यांच्या निधनाने नाशिककर हळहळले. त्यांनी लोकांना जीवदान दिले, पण काळाने त्यांच्यावर मात केली. दैवदुर्विलासच म्हणावा लागेल!