आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ (उत्तर प्रदेश) : येथील केजीएमयू रूग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. कुटुंबीय उद्धटपणे बोलल्यामुळे डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. आई, बहीण आणि पिता याबाबत डॉक्टरांची माफी मागत होते. त्यांच्या पाय पकडत मुलाच्या आयुष्याची भीक मागत होते. पण डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मुलाला तडफडत पाहून आई-वडील रडत होते. पण मदतीला कोणीही आले नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रूग्णाने स्ट्रेचरवरच प्राण सोडला. यानंतर मात्र रूग्णालयात चांगलाच गदारोळ माजला होता.
येथील हरिओम नगर (20 वर्ष) हा एका रस्ते अपघातात जखमी झाला होता. कुटुबीयांनी उपचारासाठी त्याला केजीएमयू रूग्णालयात दाखल केले. तेथे कुटुंबीयांनी डॉक्टरांना लवकरात लवकर उपचार सुरु करण्यासाठी सांगितले. डॉक्टरचे त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांनी डॉक्टरांना मोठ्याने ओरडून सांगितले. उद्धटपणे बोलल्यामुळे डॉक्टराने रूग्णावर उपचार करण्यास साफ नकार दिला. उद्धटपणे बोलल्यामुळे डॉक्टरांनी मुलावर उपचार न केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.