आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखीमुळे महिलेला रुग्णालयात केले दाखल, डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेच्या पोटातून काढले दीड किलो दागिने, पाच आणि दहा रुपयांचे नाणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीरभूम (पश्चिम बंगाल) - जिल्ह्यातील एका महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून दीड किलो दागिने आणि 90 नाणे बाहेर काढण्यात आले. महिलेला पोटदुखीमुळे या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान अल्ट्रासाउंडमध्ये तिच्या पोटात दागिने असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून बाहेर काढले. ही महिला मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. 

 

पोटात मिळाले चैन, बाळी, कानातले आणि बांगड्या

रामपुरहाट सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे शस्त्रक्रिया विभाग प्रमुख सिद्धार्थ बिस्वास यांनी सांगितले की 26 वर्षीय महिलेच्या पोटातून 5 आणि 10 रुपयांचे नव्वद नाणे, चैन, बाळी, कानातले, बांगड्या, पैंजण, कडे आणि घड्याळं काढण्यात आली. अधिकतर दागिने हे तांबे आणि पितळाचे होते. पण यातील काही दागिने सोन्याचे देखील होते. 

महिलेच्या आईने सांगितले, 'आमच्या घरातून दागिने गायब होत होते. पण जेव्हा तिच्याकडे विचारणा केल्यास ती रडण्यास सुरुवात करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती जेवण केल्यानंतर उलटी करत होती.' 

'ती भावाच्या दुकानावरून पैसे आणत होती. आम्हाला वाटत होती तिने काही खरेदी करून आणले आहे. पण ती ते खाईल हे आम्हाला माहीत नव्हते.'

 

पोटदुखीमुळे रुग्णालयात केले दाखल तेव्हा समोर आले प्रकरण 
कुटुंबीयांनी सांगतिले, की मागील दोन महिन्यांपासून महिला आजारी होती. घरच्यांनी तिला खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण तिच्या प्रकृतीत सुधारण होता नव्हती. यानंतर महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया केली.