आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन छाव्यांचा मातेप्रमाणे सांभाळ करतात डाॅक्टर, राजस्थान अमेरिकेहून मागवले दूध 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - राजस्थानातील जोधपूरमध्ये माचिया बायोलॉजिक पार्कमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्रवणसिंह राठोड गेल्या दहा दिवसांपासून बिबट्यांच्या तीन छाव्यांचा मातेच्या ममतेने सांभाळ करत आहेत. या छाव्यांच्या आईचे अन्य बिबट्यांसोबत झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत निधन झाले आहे. छाव्यांची सुटका केल्यानंतर समजले की, ते चार िदवसांपासून उपाशी आहेत. त्यांना अमेरिकेतील गाईचे दूध मागवले. सुरुवातीला या छाव्यांनी दूध पिले नाही. परंतु डॉक्टरांनी त्यांना मायेने जवळ घेऊन दूध पाजण्याचा प्रयत्न केला आणि छाव्यांनी दूध पिण्यास सुरुवात केली. दर चार तासांना त्यांना दूध द्यावे लागते. या छाव्यांची डॉक्टर नियमित वैद्यकीय तपासणी करत आहेत. रात्री त्यांना छातीशी कवटाळून झोपी जातात. या बिबट्यांनाही त्यांचा लळा लागला आहे. डॉक्टरांनी गेल्या आठ वर्षांत २६ बिबट्यांना वाचवले. यापैकी २२ पँथर्सना बरे करून त्यांनी जंगलात नेऊन साेडले आहे. 

बातम्या आणखी आहेत...