Home | Khabrein Jara Hat Ke | Doctor treated girl for Asthama but she found Something Shocking in tests

छातीत दुखते म्हणून तरुणीला डॉक्टर देत होते दम्याचे औषध, त्रास वाढल्याने डॉक्टर बदलला तर पायाखालची जमीनच सरकली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:00 AM IST

तरुण अनेकदा आजारांकडे दुर्लक्षही करतात. पण असे करू नये. आपले शरीर आपल्याला वारंवार सांगत असते की, काय होत आहे.

 • Doctor treated girl for Asthama but she found Something Shocking in tests

  अॅसेक्स​ - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीला डॉक्टरांच्या चुकीने मृत्यूच्या दाढेपर्यंत पोहोचवले. अॅसेक्समध्ये राहणाऱ्या सोफी व्हाइटने सांगितले की, तिला जवळपास तीन महिन्यांपासून थकवा आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. ती यासाठी अनेकदा डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, अस्थम्याची लक्षणे आहेत. 6 वेळा चेकअपनंतर प्रत्येकवेली डॉक्टरांनी तिला दम्याची औषधे देऊन परत पाठवले. पण सोफीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती.


  डॉक्टर बदलला आणि मग..
  - सोफीची अवस्था एवढी खराब झाली की तिला चालणे-फिरणेही कठीण झाले होते. खोकल्याने तिचा गळा चोक होऊ लागला होता. त्यानंतर तिने डॉक्टर बदलला तर तिच्या पायाखालची जमीन सरकली.
  - डॉक्टरांना एक्स रे मध्ये लक्षात आले की, सोफीच्या छातीमध्ये एक 10 सेंटिमीटरचा ट्युमर होता. त्यानंतर सोफीचे जीवनच बदलले. तिला Hodgkin lymphoma नावाचा कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


  जीवनच बदलले..
  - सोफी म्हणाली, जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की, मला कॅन्सर झाला आहे तेव्हा जणू माझे हृदयच बंद पडले. मला स्वतःचा राग येत होता. मी कधीही विचार केला नव्हता की, मला असा आजार होऊ शकतो.
  - सोफीने सांगितले की, तिने एक वर्ष शिक्षण सोडले आणि या आजाराशी लढा द्यायला सुरुवात केली. रिपोर्ट्समध्ये समोर आले की, सोफीला असलेला कॅन्सर प्राथमिक पातळीवरूल होता. त्याच्या नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यानंतर अनेक महिने किमोथेरपी चालली.
  - किमोथेरपीने सोफीचे केस गायब झाले आणि खूप अशक्तही झाली. पण तरीही तिने हार मानली नाही.


  आधी समजायला हवे होते स्वतःच्या अवस्थेसाठी सोफीने आधीच्या डॉक्टरबद्दलही नाराजी व्यक्त केली. तो डॉक्टर तिला वारंवार दम्याचे औषध देत होता. सोफी म्हणाली, या आजाराने मला प्रचंड मागे आणले आहे. मी ठीक होत आहे, पण याबाबत थोडे आधी समजले असते तर बरे झाले असते. माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबापासून दूर हॉस्पिटलमध्ये राहणे मला फार कठीण गेले.


  आजाराकडे दुर्लक्ष नको
  सोफीने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, साधारणपणे तरुणांना वाटते की, त्यांना काहीही होऊ शकत नाही. ते अनेकदा आजारांकडे दुर्लक्षही करतात. पण असे करू नये. आपले शरीर आपल्याला वारंवार सांगत असते की, काय होत आहे.

 • Doctor treated girl for Asthama but she found Something Shocking in tests
 • Doctor treated girl for Asthama but she found Something Shocking in tests
 • Doctor treated girl for Asthama but she found Something Shocking in tests

Trending