आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटातील तीन बाळांची स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले अबॉर्शन कर, महिलेने दिला नकार आणि मग..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या केटी जॉनसनने कधीही विचार केला नव्हता की, तिच्या प्रेग्नंसीने घरात तीनपट आनंद येईल. पण हा आनंद असतानाच डॉक्टरांनी तिला एक वाईट बातमी दिली. डॉक्टरांनी जेव्हा डिलिव्हरीच्या काही महिन्यांपूर्वी चेकअप केले त्यावेळी, पोटातील तीन बाळंची स्थिती पाहून त्यांनी दोन बाळांच्या अबॉर्शनचा सल्ला दिला. तिन्ही बाळांना जन्म दिला तर सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. पण त्यांची आई केटीने ऐकले नाही. 


डॉक्टरांनी सांगितले की पोटातील तीन बाळांच्या गर्भनाळेचा असा काही गुंता झाले आहे की, प्रत्येक बाळाला योग्य पोषण मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत मुले जणार नाहीत, असेच डॉक्टरांना वाटत होते. 


केटीने दिला गर्भपातास नकार 
डॉक्टरांनी इशारा देऊनही दोन बाळांचा गर्भपात करण्यास केटीने नकार दिला. पण तिची हिम्मत कामी आली. धोका असूनही तिने तीन निरोगी बाळांना जन्म दिला. तिघांची नावे ऑलिव्हर, ऑस्कर आणि आरेलिया ठेवले. ऑलिव्हर आणि ऑस्कर आयडेंटिकल होते तर आरेलिया दिसायला अगदी वेगळी होती. सर्व बाळे निरोगी कशी जन्मली याचेच डॉक्टरांना आश्चर्य वाटत राहिले होते. हा चमत्कारच असल्याचे डॉक्टर म्हणाले. पण या तिघांपैकी ऑलिव्हरचे वजन फार कमी होते. 


डॉक्टर म्हणाले, जीवाला धोका 
जन्मामनंतर केटी म्हणाली की, डॉक्टरांनी सांगितले होते की, गर्भनाळेद्वारे सर्व मुलांना योग्य पोषण मिळणार नाही. त्यामुळे ऑलिव्हर भावापेक्षा आकाराने अंदाजे 25 टक्के लहान होता. जर ऑलिव्हरचा मृत्यू झाला असता तर त्याच्या जुळ्या भावाचाही मृत्यू झाला असता असे डॉक्टर म्हणाले. असे असले तरी तिघांना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्याची माझी इच्छा होती. 


दर आठवड्याला तपासणी 
केटीने गर्भपातास नकार दिल्याने डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. त्यानंतर मुलांच्या वाढीवर लक्ष असावे म्हणून दर आठवड्याला केटीला तपासणीसाठी बोलावले जाऊ लागले. 28व्या आठवड्यात तिघांचा विकास पूर्णपणे थांबला असल्याचे समजले. पण गर्भनाळेत ब्लड फ्लो असेल तोवर बाळांना आत ठेवता येईल असे डॉक्टर म्हणाले. 


घाई-घाईत केले ऑपरेशन 
31व्या आठवड्यात डॉक्टरांना समजले की, ऑलिव्हरपर्यंत रक्त पोहोचणे बंद झाले आहे. त्यानंतर घाई घाईत ऑपरेशन करून मुलांना बाहेर काढण्यात आले. तसे केले नसते तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर ख्रिसमसला मुले घरी आली. 

बातम्या आणखी आहेत...