आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी शोधली उपचारासाठी नवीन पद्धत, रुग्णाच्या प्रकृतीत 30 टक्क्यांनी लवकर सुधार होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क - अमेरिकामध्ये डॉक्टरांनी विविध आजारांच्या उपचारांसाठी नवीन पद्धत तयार केली आहे. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत 30 टक्क्यांनी त्वरित सुधारणा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या सरकारने डॉक्टरांच्या या पद्धतीला औषधांचा पर्याय म्हणून देखील संबोधले आहे. यामुळे रुग्णांना वेगवेगळ्या रोगांचा सहजतेने सामना करण्याची शक्ती मिळते.

 

> अमेरिकेच्या आरोग्य विभागाचे सचिव मॅट हँकॉक यांनी सांगितले की, फक्त औषधांवर विश्वास ठेवल्याने उपचार होत नसतो. औषधांसोबत त्या रूग्णाची आपुलकीने काळजी घेणे सर्वांत महत्वाचे आहे आणि यामुळे रूग्णाला आजार आणि औषधांचा काही काळासाठी विसर पडण्यास मदत होते. हँकॉकच्या मते, जेव्हा रुग्ण त्याच्या छंदांचा आनंद घेतो तेव्हा तो एका औषधासारखा काम करतो. यामुळे त्याची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

 

> गेल्या 10 वर्षात केस स्टडीजच्या अभ्यासानुसार असे दिसुन आले की, उपचार पद्धतीमध्ये डान्सचा समावेश केल्याने ह्रदयासंबंधीचे आजार, नैराश्य आणि ड्रग्स तसेच व्यसनाधीन झालेल्या रूग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा दिसली आहे. सोबतच मानसिकदृष्ट्या पीडित असलेल्या लोकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता ब्रिटनमध्येही डॉक्टरांनी उपचारासाठी औषध म्हणून डान्सचा पर्याय स्वीकारला आहे.

बातम्या आणखी आहेत...