आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासात दोन वेळा मृत आणि एकदा जिवंत झाली महिला, कुटूंबासोबत पोलिसही होते हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपुर. अंबेडकर हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मृत घोषित करण्यात आले. 15 तासांनंतर बुधवारी सकाळी 8 वाजता कुटूंबिय मृतदेह घेण्याची तयार करत असताना डॉक्टरांनी सांगितले की, ती जिवंत आहे. फक्त ब्रेन डेड झाले आहे. कुटूंबातील लोक हैराण झाले. त्यांना महिलेच्या जिवंत राहण्याच्या आशा जागा झाल्या. परंतू संध्याकाळी 4 वाजता महिलेला पुन्हा मृत घोषित करण्यात आले. महिलेच्या दोन वेळा मृत आणि एकदा जिवंत होण्याच्या वृत्ताने कुटूंबासोबत पोलिसही हैराण होते. हे काय होतेय हे कुणालाही कळत नव्हते. 24 तासानंतर डॉक्टरांनी महिलेला फायनल मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

 

महिलेचा 23 तासांनंतर मृत्यू झाला 
- या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये खुप धावपळ झाली. मृताच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली नाही, परंतू हॉस्पिटल प्रशासनाने संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. विवेक चौधरी मानत आहे की, जिवंत महिलेला मृत घोषित करणे खुप निष्काळजीपणाचे आहे. असे का झाले? याचा तपास केला जाईल.
- प्राथमिक तपासात समोर आले की, जनरल सर्जरी विभागाच्या ज्यूनियर डॉक्टरने महिलेला मृत घोषित करुन नातेवाईकांना सुचना दिल्या होत्या. याच माध्यमातून ही बातमी अधिका-यांपर्यंत पोहोचली.
- महिलेचा अपघात झाला होता. यामुळे मंगळवारी रात्री उशीरा हे वृत्त पोलिसांना कळवण्यात आले. 
- बुधवारी जेव्हा महिला जिवंत असल्याचे कळाले तेव्हा तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये सुचना पत्र बदलण्यात आले. परंतू 23 तासानंतर बुधवारी संध्याकाळी 4 वाजता महिलेचा मृत्यू झाला. 

 

ज्यूनियर डॉक्टरांनी घाई केली, सीनियर डॉक्टरांनी जास्त लक्ष दिले नाही 
तपासात समोर आले की, महिलेला मृत घोषित करण्यात जनरल सर्जरी विभागाच्या प्रथम वर्षाच्या डॉक्टरांनी घाई केली. नंतर सीनियर डॉक्टरांना तपासणी करण्याची गरज वाटली नाही. रुग्णाच्या बेड जवळील मॉनीटरच्या संकेताच्या आधारावर महिलेला मृत घोषित करण्यात आले. 

 

15 तास जिवंत महिलेवर केले नाही कोणतेही उपचार 
अंबेडकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता महिलेला मृत घोषित केले. बुधवारी सकाळी 8 वाजता जिवंत होण्याची घोषणा केली. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा उपचार सुरु केले. त्यापुर्वी 15 तास महिला कोणतेही उपचार न घेता हॉस्पिटलमध्ये पडलेली राहिली. तिच्यावर चादर टाकण्यात आली होती. ही घटना दिवसा घडली असतील तर तिला एका तासाच्या आत पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असते. रात्र असल्यामुळे महिलेला ट्रामा सेंटरच्या बेडवर ठेवण्यात आले. यामुळे ती जिवंत असल्याचे कळाले. 

महिला दोन दिवसांपासून ब्रेन डेड होती. ज्यूनिअर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकरण समोर आले. अखेर ब्रेन डेड महिलेला मृत घोषत का करण्यात आले, याचा तपास केला जात आहे. दोषी डॉक्टरांविरुध्द कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. विवेक चौधरी, अधीक्षक अंबेडकर हॉस्पिटल 

बातम्या आणखी आहेत...