आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : खूप दिवसांपासून नाकातून रक्त येण्याला समजत होता उष्णता, अचानक वाढला त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 व्हिएतनाम : येथे राहणार एक व्यक्ती नाकाच्या दुखण्यामुळे खूप दिवसांपासून त्रस्त होता. अनेकवेळा त्याच्या नाकातून रक्त येत होते. त्याला वाटायचे की, उष्णतेमुळे असे होत असेल परंतु अचानक एकेदिवशी त्याच्या नाकाचा त्रास वाढला आणि नाकातून रक्त येऊ लागले. तो लगेच डॉक्टरांकडे गेला. तपासणीमध्ये जे दिसून आले ते पाहून संपूर्ण स्टाफ घाबरून गेला.


काय होते नाकामध्ये...
- येथील हॉस्पिटलने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. डॉक्टरांनी त्याच्या नाकाची तपासणी केल्यानंतर त्यांना नाकामध्ये एक विचित्र गोष्ट दिसली. त्यानंतर डॉक्टरांनी मिनी कॅमेऱ्याने नाकाची तपासणी केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
- नाकामध्ये एक जिवंत रक्त पिणारा जळू (रक्त पिणारा किडा) दिसला. हा किडा त्या व्यक्तीच्या नाकातील रक्त शोषून घेत होता आणि यामुळे व्यक्तीच्या नाकातून रक्त येत होते.
- डॉक्टर टुयान यांनी हा किडा बाहेर काढला.


रडून-रडून बेहाल झाला व्यक्ती
- नाकातील हा किडा बाहेर काढल्यानंतर व्यक्ती रडून-रडून बेहाल झाला. कारण डॉक्टर किड्याला बाहेर काढण्यासाठी ओढत असताना किडा आणखी ताकदीने नाकाला चिटकत होता.


नाकामध्ये कसा गेला किडा 
- हॉस्पिटल रिपोर्टनुसार, हा व्यक्ती येथील पर्वतरांगांमध्ये राहतो. पाणी पिण्यासाठी जवळपासच्या तलावाचा वापर करतो. डॉक्टरांना शक्यता वाटते की, याच पाण्यातून किडा नाकात गेला असेल. पहिले हा किडा छोटा असल्यामुळे व्यक्तीला जास्त त्रास झाला नसेल.

बातम्या आणखी आहेत...