आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरकीचे स्वप्न भंगले, गुणवंत बनला बॅटरीचाेर मित्राच्या संगतीने लागला वाममार्गाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बारावीत ८७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला मात्र ‘नीट’ परीक्षेत अपयश आल्याने एक गुणवंत विद्यार्थी चक्क बॅटरीचोर बनला आहे. उत्तर प्रदेशातील तरुणाची घरची अार्थिक परिस्थिती उत्तम आहे. परंतु, वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो वाममार्गाला लागला आहे. नीट उत्तीर्ण होऊन आपल्याला डॉक्टर बनायचे होते, असेे त्याने पाेलिसांना सांगितली. त्याची ही कहाणी एेकून पोलिसांनाही गहिवरून अाले. मात्र, त्याच्यावर कारवाई हाेणारच असल्याचे पाेलिसांनी सांगितले.


समशद खान इरफान जहीर खान (१९, तुलसीपूर, जि.बल्लामपूर, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव अाहे. हडपसर पोलिसांनी नुकताच पुणे शहर अाणि जिल्ह्यात माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरी करणाऱ्या परप्रांतीय टाेळीचा पर्दाफाश केला असून ५ अाराेपींकडून १८ गुन्ह्यांतील विविध कंपन्यांच्या माेबाइल टाॅवरच्या एकूण ६६ बॅटऱ्या, १ टेम्पाे व १ इंडिका कार असा १० लाख ६२ हजार रुपयांचा माल जप्त केला अाहे.

 

समशद खानच्या वडिलांचे सुरतमध्ये कपडे व्यवसायाचे दुकान असून त्याचे कुटुंबीय उत्तर प्रदेशात स्थायिक अाहेत. नीटच्या परीक्षेत अपयश अाल्याने ताे उत्तर प्रदेशातून सातारा येथे पीअाेपीचे काम करणाऱ्या चुलत भावाकडे राहण्यास अाला हाेता. मात्र, पुण्यात त्याचे गावाकडील मित्र रहेमतुल्लाह बरकतउल्लाह खान अाणि जुल्फेकार इब्रार खान हे राहत असल्याने तोसुद्धा त्यांच्यासोबत हडपसर परिसरात राहू लागला. त्यांच्या नादाला लागून चोरी करू लागल्याची कबुली त्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...