आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कापावा लागला चिमुरडीचा हात, आईला म्हणते-हात कापायला हॉस्पिटलमध्ये आणता का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - 19 जुलैला 11000 व्होल्टचा करंट लागल्यामुळे भाजलेल्या 11 वर्षीय चिमुरडीचा शनिवारी एक हातही कापावा लागला आहे. कायम नाचत बागडत असणारी ही चिमुरडी आता अपंग बनली आहे. महानगरपालिका आणि पावरकॉमने तिचा आनंदच हिरावून घेतला आहे. कारण पालिकेने हायटेन्शन तारांखाली अवैध घर बांधू दिले आणि पावरकॉमने भिंतीला लागून असलेल्या वीजेच्या तारांबाबत काहीही पाऊल उचलले नाही. 


आधी दोन्ही पायाची सर्व बोटे आणि हाताच्या अंगठ्यासह दोन बोटे कापली 
- अपघात झाला त्याठिकाणी दुकानाच्यावर तयार करण्यात आलेल्या अवैध इमारतीमध्ये ही चिमुरडी प्रॅक्टीस करायला जात होती. या अपघातात गुनगुनची मैत्रीण 12 वर्षीय इश्मित कौरचाही मृत्यू झाला होता. 
- जेव्हा इश्मितला करंट लागला तेव्हा गुनगुनने धीर दाखवत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पाय पकडून ती इश्मितला ओढू लागली. पण त्यामुळे तिलाही जोरदार करंट लागला. जीटीबी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण डाव्या हाताचे एक बोट आणि अंगठा तसेच दोन्ही पायाची बोटे कापावी लागली होती. यानंतर ती बरी होईल असे वाटत होते, पण तिच्या डाव्या हाताची इतर बोटेही कापाही लागली. 
- एक दिवस अचानक तिच्या हातातून रक्त येऊ लागले. नातेवाईक तिला घेऊन दवाखान्यात आले तर चौकशीत समजले कीस इन्फेक्शन पसरल्याने धोका वाढला आहे आणि जीव वाचवण्यासाठी मुलीचा हात कापावा लागला. 


स्वतःला सावरत होती पण आता हात पाहून आईशी भांडते 
- 1 ऑगस्टला हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर गुनगुन स्वतःला सावरायला लागली होती. कुटुंब, नातेवाईक यांच्यात ती त्या अपघाताबद्दल विसरू लागली होती. पण आता ती पुन्हा निराश झाली आहे. ती आईशी भांडण करते. माझा हात का कापायला लावला, हॉस्पिटलमध्ये माझे हात पाय कापायला का घेऊन येता असे ती आई वडिलांना म्हणते. 
- ऑपरेशननंतर ती शुद्धीत आली तेव्हा हात कापलेला पाहून मोठ्याने रडू लागली. 
- ऑपरेशन करणारे डॉक्टर म्हणाले की, डाव्या हातातून शरिरात करंट गेला होता म्हणून त्या भागाला जास्त इजा झाली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...