आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्युटी पार्लरहून आलेल्या महिलेच्या बोटाला झाले इन्फेक्शन, करावे लागले सहा ऑपरेशन, छोटीशी चूक पडली महागात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये एक महिला ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि तिथे असे काही घडले की तिच्या जीवालाच धोका निर्माण झाला. पार्लरहून परतल्यानंतर महिलेच्या बोटाला इन्फेक्शन झाले. ती लगेचच डॉक्टरांकडे गेली त्याठिकाणी तिचे सलग सहा ऑपरेशन झाले. पण बॅक्टेरिया एवढा धोकादायक होता की जीव वाचवण्यासाठी महिलेचे बोटच कापावे लागले. 


डेली मेलनुसार स्टेला फालकन मॅनीक्योर करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्यावेळी मॅनिक्योरदरम्यान तिचे बोट काहीसे कापले गेले. ब्युटिशियनने तिचा घाव स्वच्छ केला आणि किरकोळ जखम समजून पुन्हा कामाला लागली. 


महिला घरी आल्यानंतर तिला ताप येऊ लागला. तेवढेच नाही तर तिच्या बोटाला मोठ्या प्रमाणात सूज आल्याचे दिसून आले. त्यानंतर लक्षात आले की, तिच्या बोटाला अत्यंत धोकादायक असे इन्फेक्शन झाले होते. 

 

महिलेने सांगितले की, ज्या मशीनद्वारे मॅनिक्योर केले जात होते ते व्यवस्थितपणे स्वच्छ करण्यात आले नव्हते. त्यामुळेच मला हे इन्फेक्शन झाले. डॉक्टरांनी सांगितले की, जर स्टेलाचे बोट कापले नसते तर हा धोकादायक आजार तिच्या शरिरारत पसरला असता आणि तिचा जीव गेला असता. 

पुढे वाचा, तज्ज्ञांनी सांगितले असे काही झाले तर काय करावे... 

बातम्या आणखी आहेत...