आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्मल डिलिव्हवरीनंतर महिलेला आली चक्कर, कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेले, सोनोग्राफीत जे दिसले ते पाहून सगळ्यांना बसला धक्का...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरगोन(मध्यप्रदेश)- जिल्हा रूग्णालयातील नॉर्मल डिलिव्हरीमध्ये निश्काळजीपणाची प्रकरणे थांबतच नाहीयेत. यांतच एक नवीन प्रकरण समोर आले आहे. डॉक्टरांनी महिलेची नॉर्मल डिलिव्हरी केली, त्यावेळस तिच्या पोटात कपडा राहिल्याचे प्रकरण समोर आले आहे. तिसऱ्या दिवशी सुट्टी मिळाल्याने महिला घरी गेली आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तत्काळ तिला खासगी रूग्णालयात नेण्यात आले, चेकअपमध्ये कळाले की, पोटात 53 टक्के इन्फेक्शन पसरले होते.


कल्चर अँड सेंसेटिव्ह सोनोग्राफी रिपोर्टमध्ये झाला खुलासा
रूपालीची कल्चर अँड सेंसेटिव रिपोर्टमध्ये खुलासा झाला. डॉक्टरांनी 52 टक्के इन्फेक्शन झाल्याचे सांगितले. अशा प्रकरणात 6 ते 7 टक्के इन्फेक्शन शरीर सहन करू शकते, तर पल्स 170-180 होती. पण सामान्य रूग्णांची 90-100 असते. गर्भाशयात कपड्यामुळे दोन प्रकराचे बॅक्टिरिया पसरले होते. पस सेल्स 10 ते 12 ग्राम निघाला. त्यासोबतच सोनोग्राफी रिपोर्टमध्ये 113 एनएल लिक्विड मिळाला.

 

टाके लावल्यानंतर विसरले कपडा
डिलिव्हरीदरम्यान स्टाफने ब्लीडिंग झाली म्हणून कपडा ठेवला. त्यानंतर टाके लावले आणि कपडा पोटातच विसरला. त्याच दिवशी इतर दोन महिलांच्या पोटाटदेखील कपडा विसरल्याचे समोर आले होते. त्या महिलांनीही डॉक्टरांची तक्रार केली होती, या तिन्ही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.


सगळा स्टाफ चुकीची वागणुक देतो
मॅटरनिटी वार्डमध्ये सगळ्यात जास्त रूग्ण येतात, एका दिवसांत 30 ते 40 महिला भर्ती होतात. यांत 5 ते 7 महिलांच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे समोर येते. रूग्ण भर्ती असतो त्यामुले कोणीच तक्रार दाखल करत नाही, आणि जर कोणी केलीच तर त्यांना डॉक्टर आणि स्टाफ वाईट वागणुक देतात.

 

बातम्या आणखी आहेत...