आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातग्रस्त मुलास डॉक्टरने प्लास्टर केले पण औषध दिलेच नाही, आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका ८ वर्षांच्या मुलास वण-वण भटकण्याची वेळ आली. त्याचे झाले असे की, रघुवन मार्केटजवळ मगदूम नगर रेल्वेस्थानकाजवळचा रहिवाशी आहे. अकबर शहा (८) याला टेम्पोने धडक दिली होती. अपघातात डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्याचबरोबर त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. उपचारासाठी त्याचे वडील रईस शरीफ यांनी त्याला दवाखान्यात नेले. हाडाच्या डॉक्टरांनी घाईघाईत त्याला प्लास्टर केले. परंतु त्याचे वडील जेव्हा औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानात गेले तेव्हा त्यावर औषधी लिहून दिलीच नव्हती, असे मालकाने सांगितले. तो म्हणाला, औषधे तर लिहून आणा. त्यानंतर तो आर्थोविभागात गेला तेव्हा त्याला सर्जरी विभागात पाठवण्यात आले. तोपर्यंत दुपारचा एक वाजला होता. बाह्य रुग्ण विभाग बंद झाला होता. अकबर पुन्हा सायंकाळी दवाखान्यात गेला. भटकंती केल्यानंतर समजले की, आता सोमवारीच त्याला डॉक्टर भेटतील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...