आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctors Perform Surgery By Wearing Astrologers Suit To Prevent Patients From Infected

रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर करतात अंतराळवीरांसारखा सूट घालून शस्त्रक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एका रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. येथील शस्त्रक्रियागाराची (ओटी) व्यवस्था नासाच्या निकषानुसार केली आहे. डाॅक्टर अंतराळविरांसारखा ड्रेस घालून शस्त्रक्रिया करतात. सांधे प्रत्यारोपण प्रक्रियेत रुग्णांचा संसर्गापासून बचाव करणे हा उद्देश असतो. मध्य भारतात प्रथमच अशा प्रकारचा अनोखा व अत्याधुनिक प्रयोग सुरू केल्याचा दावा आहे. सर्जन डॉ. अंकुर सिंघल यांनी सांगितले, शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होण्याची भिती असते. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या शरीरातही विषाणू असतात. ते कातडीवर परिणाम करू शकतात.

जर्मनी व इंग्लंडमध्ये होतात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया

डॉ. सिंघल म्हणाले, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया जर्मनी व इंग्लंडमध्ये होतात. आता मेट्रो शहरातील रुग्णालयात ही पद्धत आली आहे. आम्ही प्रशिक्षणासाठी जर्मनीला गेलो होतो. तेव्हा अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला. मध्य भारतात प्रथमच शस्त्रक्रिया होत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...