आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षीय मुलाच्या डोळ्यात येत होती खाज, आईने बघितले असता डोळ्यात काहीतरी असल्याचे दिसले: हॉस्पीटलमध्ये गेले असता डोळ्याची अवस्था पाहून डॉक्टरही झाले शॉक्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शांशी : चीनमधील पाच वर्षीय मुलगा अनेक दिवसांपासून डोळ्यातील खाजेमुळे त्रस्त होता. त्याच्या आईने डोळ्यात पाहिले असता त्यात काहीतरी असल्याचे तिला जाणवले. तिने ते काढण्याचा प्रयत्न देखील केला पण यश आले नाही. अखेर डॉक्टरांना दाखवले असता, डॉक्टरही त्याच्या डोळ्याची अवस्था पाहून हैराण झाले. डॉक्टर म्हणाले की, कुत्र्यामुळे नेमाटोड इंफेक्शन होते आणि त्यामुळे डोळ्यांना त्रास होत असतो. 

 

डोळ्यातून काढले 11 जिवंत वर्म्स

> चीनच्या शांशी प्रोविन्स येथील ही घटना आहे. येथे 5 वर्षीय डॉन्ग डॉन्गच्या डोळ्यात खाज येत होती. त्याच्या डोळ्यात काहीतरी तरंगत असल्याचे दिसत होते. 
> मुलाची आई त्याला शियान नंबर 1 रूग्गणालयात घेऊन गेली होती. मुलाच्या डोळ्याची अवस्था पाहून डॉक्टरही शॉक्ड झाले. त्याच्या डोळ्यात 11 जिवंत वर्म तरंगत होते. 
> 21 मिनिटांच्या प्रयत्नानंतर मुलाच्या डोळ्यातील वर्म्स काढण्यात यश आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. 
> डॉक्टरांनी सांगितले की, मुलगा नेमाटोड इंफेक्शने त्रस्त आहे. हे इंफेक्शन एखाद्या पाळीव कुत्र्याच्या संपर्कात आल्यामुळे झाले आहे. 
> यानंतर मुलाच्या आईने कुत्र्याच्या संपर्कात येणारी गोष्ट स्पष्ट केली. तिचा मुलगा शेजारील पाळीव कुत्र्यासोबत खेळत असल्याचे तिने सांगितले. 

 

काय आहे नेमाटोड इंफेक्शन?
> नेमाटोड इंफेक्शन वर्म एका प्रकारच्या थेलाजिया कॅलिपॅड्डा स्पेशीज आहेत. चीनमध्ये 100 वर्षांपूर्वी या इंफेक्शन विषयी माहीत झाले होते. युरोप आणि आशियात नेमाटोड इंफेक्शनमुळेच वर्म्स होत असतात. कुत्रा. मांजर आणि माणसाच्या डोळ्यात ते आढळतात.  हे वर्म्स परजीवी असतात. जिवंत राहण्यासाठी आणि खाण्या-पिण्यासाठी माणसाचा उपयोग करतात. 

बातम्या आणखी आहेत...