आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG:गर्भवती महिलेच्या तपासणीत स्वतःच्याच हृदयाशी खेळताना दिसले बाळ, त्यानंतर डॉक्टरांसह सर्वच होते धक्क्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीसेस्टर - इंग्लंडच्या हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर एक बाळा जन्मानंतर जवळपास एका वर्षाने त्याच्या घरी गेले आहे. वर्षभरापूर्वी या बाळाचा जन्म झाला त्यावेळी त्याचे वजन अत्यंत कमी आणि हृदय शरीराच्या बाहेर दिसत होते. बाळाची अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याची जगण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे म्हटले होते. पण डॉक्टरांना या बाळाला वाचवण्यात यश आले. डिलिव्हरीपूर्वी डॉक्टरांनी महिलेचे स्कॅन केले तेव्हा बाळ स्वत:च्या हृदयाबरोबर खेळत असल्याचे पाहून डॉक्टरांना धक्काच बसला होता. ब्रिटनमध्ये अशाप्रकारे जन्मनारे हे पहिलेच बाळ आहे. 


स्वतःच्याच हृदयाशी खेळत होते बाळ 
- इंग्लंडच्या लीसेस्टरमधील नाओमी फिंडले आणि डीन विल्किन्स यांच्या घरी गेल्यावर्षी एका चिमुरडीने जन्म घेतला. तिचे नाव वेनेलोप ठेवण्यात आले. तिच्या जन्माने सर्वच प्रचंड आनंदी होते. 
- पण बाळाचे हृदय शरीराबाहेर असल्याचे जगण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सगळेच तणावात होते. आईचे स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना हे समजले होते. या गर्भामध्ये बाळ स्वतःच्या हृदयाशी खेळत असल्याचे दिसले होते. 
- जन्म झाला तेव्हा वेनेलोप फारच अशक्त होती. तिचे वजन अवघे 1.5 किलो होते. चिमुरडीची अवस्था फार चांगली नव्हती पण 50 डॉक्टर्सच्या टीमने तिला वाचवण्याचे आतोनात प्रयत्न केले. 
- डॉक्टरांच्या मते, 'एक्टोपिया कॉर्डिस' नावाच्या आजारामुळे तिचे हृदय शरिराबाहेर आले होते. त्यामुळे जन्मानंतर तीन आठवड्यांत तिच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. 


छातीत जागा करून हृद्य आत ठेवले 
- मुलीच्या शरिरात हृदयासाठी जागा तयार करण्यासाठी तिची छाती कापून त्याठिकाणी जागा करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांत हृदय आपोआप त्याठिकाणी फिट झाले. शरीरात हृदय बसवण्यासाठी त्यावर एक रक्षात्मक ढाल तयार करण्यात आली आणि नंतर रिकामी जागा भरण्यासाठी त्वचेच्या मदतीने रिकामी जागा पॅक केली. 
- आई नाओमी म्हणाली की, बाळासाठी पहिले वर्ष वाईट गेले. अनेकदा तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण ही चिमुरडी एवढी स्पेशल आहे की, मेडीकल डिक्शनरीत आता तिच्या नावाचे एक स्वतंत्र पान आहे. 
- वर्षभर चाललेल्या उपचारानंतर आता चिमुरडीला कसलाही धोका नाही. पण जगण्यासाठी तिला अजूनही ऑक्सिजन आणि खूप औषधे खावी लागतात. 
- डॉक्टरांनी तिची प्रकृती सुधारल्यानंतर वर्षभराने तिला घरी जाण्याची परवानगी दिली. ख्रिसमसचे सर्वात मोठे गिफ्ट मिळाल्याचा आनंद त्यांना आहगे. पण अजूनही चिमुरडी तीन दिवस घरी आणि चार दिवस हॉस्पिटमध्ये राहते. 

बातम्या आणखी आहेत...