आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! त्याच्या छातीचा एक्स-रे पाहून गोंधळले डॉक्टर; त्यालाच विचारले, तु एवढ्या वर्षे जिवंत कसा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनजियांग- चीनमध्ये एका व्यक्तीच्या छातीत 8 इंच लांब चमचा आढळून आल्याची घटना घडली आहे. मीस्टर जँग असे या व्यक्तीचे नाव असून अचानक छातीत वेदना होऊ लागल्याने तो दवाखान्यात गेला. तिथे डॉक्टरांनी  एक्स-रे केल्यानंतर त्याच्या छातीमध्ये चमचा अडकला असल्याचे सांगितले. छातीत चमचा असूनही एवढ्या वर्षानंतरही जँग जिवंत राहिल्याने डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

मित्रांसोबत लावलेली पैंज जिंकण्यासाठी  गिळला होता 8 इंच चमचा

>  काही दिवसांपूर्वी जँग चिनजियांगमधील मेकुआंग जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे केल्यानंतर त्याच्या छातीत चमचा अडकल्याने त्याला वेदना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला चमचा गिळल्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, मित्रांसोबत लावलेली पैंज जिंकण्यासाठी त्याने 8 इंच चमचा गिळला होता. चमचा गिळल्यानंतर जवळपास एक वर्ष त्याला काहीच वेदना जाणवल्या नाही. नंतर अचानक त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला श्वास घेण्यास कठीण झाले. त्यामूळे तो हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आला. 

 

डॉक्टरांनी सांगितले, आमच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा अशी केस पाहीली

मिस्टर जँगवर उपचार करणारे डॉक्टर यु झीवू यांनी सांगितले की, ''अशी केस माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समोर आली. आम्ही आश्चर्यचकीत आहेत की, चमचा गिळल्यानंतर एवढ्या वर्षे हा व्यक्ती जिवंत कसा काय राहीला?"

 

दोन तास सुरू होते ऑपरेशन

>  ऑपरेशन करत असताना डॉक्टरांनी सांगितले की, मिस्टर जँगच्या गळ्यात अन्न नलिकेजवळ चमचा अडकला होता. चमचा अडकाला असूनही अन्न नलिकेला कोणतीच इजा झालेली नव्हती. जवळपास दोन तासांच्या ऑपरेशनदरम्यान जँगच्या गळ्यातील चमचा काढण्यात आला असून त्याची प्रकृती व्यवस्थीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...