आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बर्मिंघम - इंग्लंडचे अब्जाधीश बिझनेसमन रिचर्ड मॅसन यांना त्यांच्या एक्स वाइफने आश्चर्यकारकरित्या चीट केले आहे. MoneySupermarket.com चे को-फाउंडर रिचर्ड यांनी दोन वेळा विवाह केला असून त्यांना तीन मुले आहेत. नुकतेच मॅसन हॉस्पिटलमध्ये काही टेस्ट करण्यासाठी गेले होते. कारण त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना अपत्य होत नव्हते. टेस्टमध्ये त्यांना समजले की, ते लहानपणापासूनच इनफर्टाइल आहेत. म्हणजे ते कधीही पिता बनू शकत नव्हते. हे समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना धोका दिला होता हे या टेस्टवरून स्पष्ट होत होते. तसेच 21 वर्षे ज्या मुलांना ते स्वतःचे समजत होते ते त्यांचे नव्हतेच.
डीएनए टेस्टही केली
डॉक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी दोन मुलांची डीएनए टेस्टही केली. त्यात हे सत्य असल्याचे समोर आले. कारण त्याचा आणि मुलांचा डीएनए जराही मॅच होत नव्हता. पण तिसऱ्या मुलाने डीएनए टेस्टसाठी सॅम्पल देण्यास नकार दिला होता. तर इतर दोन मुलांनी रिचर्डशी बोलणे बंद केले आहे. पण तिसरा मुलगा मॅसेज करून रिचर्डला म्हणाला, तुम्हीच माझे पिता आहात.
पुढे वाचा, काय म्हणाली एक्स वाईफ..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.