आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य पती पत्नींसारखे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्येही होते का तक्रार, ऐश्वर्या रायने दिले उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता 12 वर्ष झाले आहेत. यादरम्यान एक अशी गोष्ट समोर अली आहे जी खूप हैराण करते. लग्नाच्या 12 वर्षांनंतरही कोणत्या गोष्टीवरून ऐश्‍वर्या आणि अभिषेकमध्ये वाद होतात. अभिषेक आणि ऐश यांच्यामध्ये वाद होता नाहीत असे तुमहाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. सर्व पती पत्‍नीप्रमाणेच या दोघांमध्येही वाद होतात. याचा खुलासा ऐश्‍वर्यानेच केला आहे. फिल्मफेयरला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये जेव्हा ऐश्‍वर्याला विचारले गेले की, तिचे अभिषेकसोबत कोणत्या गोष्टीवरून जास्त वाद होतात तर ती अगोदर तर हसली आणि मग म्हणाली, "मला वाटते वाद आणि चर्चा यांच्यामध्ये थोडाच फरक असतो. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करतो. ऐश्वर्याने पुढे सांगितले आम्ही 12 वर्षांपासून लग्नाच्या बंधनात आहोत. लग्नाच्या आधीपासूनच आम्ही एकमेकांनां ओळखत होतो आणि चांगले मित्र होतो. आम्ही नेहमीच एकमेकांशी खूप बोलायचो आणि आजही खूप बोलतो". ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने 20 एप्रिल 2007 ला लग्न केले होते. दोघानं 6 वर्षांची एक मुलगी आहे आणि तिचे नाव आराध्या आहे. 

 

'प्लास्टिकची बाहुली' ही कमेंट अद्याप विसरू शकली नाही ऐश्वर्या...  
- इंटरव्यूमध्ये ऐश्वर्या रायने सांगितले की तिला 'प्लास्टिकची बाहुली'ही म्हणले गेले होते. फिल्मफेयरला दिलेल्या इंटरव्यूमध्ये ऐश्वर्याने रॅपिड फायर राउंड खेळताना सांगितले की तिच्या आयुअश्यातील ही सर्वात वाईट कमेंट होती की, ती 'फेक' आणि 'प्लास्टिक' आहे. 
- करन जौहरच्या चॅट शो 'कॉफी विद करन' मध्ये खूप आधी इम्रान हाशमीने तिच्यासाठी असेच काहीतरी म्हणाल होता. रॅपिड फायर राउंडमध्ये करन एका नंतर एक नाव पटापट घेत होता ज्यानंतरव त्या व्यक्तीच्या डोक्यात जी गोष्ट अगोदर येईल ते बोलायचे होते. जेव्हा करण जौहरने ऐश्वर्याचे नाव घेतले तेव्हा इम्रान हाशमी 'प्लास्टिक' म्हणला.  
- इम्रानच्या या उत्तरामुळे तो त्यावेळी खूप चर्चेत होता. चर्चा हीदेखील झाली होती की, ऐश्वर्याला फिल्म 'बादशाहो'ची ऑफर मिळाली होती पण जेव्हा तिला कळले की फिल्ममध्ये इम्रान तेव्हा तिने चित्रपटाची ओफर ठोकरली.  
- नंतर इम्रान हाशमीने आपल्या त्या कमेंटसाठी माफी म्हणाला,  जे उत्तर त्याच्या डोक्यात आले ते त्याने त्वरित दिले.  इम्रानने तेव्हा माफी मागितली पण ऐश्वर्या अजूनही ती गोष्ट विसरली नाही. 

 

विवेकसुद्धा म्हणाला होता ऐश्वर्याला 'प्लास्टिक ऐश'... 
- ऐश्वर्याने कधी हे स्पष्ट केले नाही की ती विवेकसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण प्रत्येक फंक्शनमध्ये दोघे सोबत दिसायचे. सलमानने विश्वासघात केल्यावर विवेकला वाटायचे की त्याने नेहमी ऐश्वर्यासोबत राहावे. एकदा 2003 मध्ये विवेकने हॉटेलच्या रूममध्ये एक प्रेस कॉन्फ्रेंस बोलावली आणि सांगितले, ''मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रतरी नशेत मला 41 वेळा फोन फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली". प्रेस कॉन्फ्रेंसनंतर ऐश्वर्या स्वतःच विवेकपासून दूर झाली, कारण तिला कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचे नव्हते. ऐश्वर्याने विवेकला अवॉइड करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर ऐश्वर्या विवेकला इमैच्योर पर्सनसुद्धा म्हणाली. 

- विवेकने फराहसोबत एका टॉक शोमध्ये कबूल केले होते की, ती प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन त्याने चूक केली. एवढेच नाही तर त्याने त्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये अशाही अनेक गोष्टी बोलल्या ज्या त्याने बोलायला नको होत्या. मात्र, नंतर विवेक ऐश्वर्याला 'प्लास्टिक ऐश' म्हणाला होता. एवढेच नाही ऐश्वर्याकडून फसवल्या गेल्यामुळे विवेक तिला 'प्लास्टिक हार्ट' आणि 'प्लास्टिक स्माइल' देखील म्हणाला होता. 

बातम्या आणखी आहेत...