आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामासाठी जिमला जाण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अापल्या व्यक्तिमत्त्वाला चमकवण्यासाठी आणि शरीराला निरोगी आिण चांगले ठेवण्यासाठी लोक जिमकडे वळत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत लोक व्यायामाकडे जास्त लक्ष देतात. परंतु जिममध्ये जाण्याचा तेव्हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही व्यायाम करताना काही गोष्टींकडे लक्ष द्याल. जाणून घ्या की, जिममध्ये काय करावे आणि काय करू नये. 


काय करावे 
1.
तुमच्यासाठी एक चांगली जिम निवडा. कमी फीमुळे अशा जागी जाऊ नका, जिथे यंत्रांमळे तुम्ही जखमी व्हाल. 


2. तुमचा प्रशिक्षक जितका शिस्तप्रिय आिण प्रोत्साहित करणारा असेल तुम्हाला त्याचा जास्त आिण लवकर फायदा होईल. 


3. व्यायाम करताना सैलसर कपडे घाला. परंतु ते खूप सैलही नको आिण खूप तंगही नको. चांगल्या ग्रीपचे स्पोर्ट््स शूज घाला. 


4. जिमला जाण्यापूर्वी कार्बोहायड्रेटयुक्त आहार जसे फळे किंवा टोस्ट खा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी थोडे थोडे पाणी प्या. 


5. जिमवर परत आल्यानंतर प्रोटीनयुक्त आहार अवश्य घ्या. यात दूध, चीज, बदाम, अंडी किंवा इतर पदार्थ घेऊ शकता. 


6. व्यायाम करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्या. या विश्रांतीमध्ये थोडा वेळ चाला. परत व्यायाम सुरू करा. 


काय करू नका 
1.
जिममध्ये गेल्यानंतर टीव्ही आिण इंटरनेटवर पाहून व्यायाम करू नका. नेहमी प्रशिक्षकाच्या निगराणीतच करा. 


2. सरळ मशीनवर व्यायाम सुरू करू नका. सुरुवातीला वॉर्मअप आिण स्ट्रेचिंग करा. यामुळे मांसपेशीत तणाव येणार नाही. 


3. संगीत ऐकता ऐकता व्यायाम करताना एक ऱ्हिदम असतो, परंतु लक्षात ठेवा इअर फोन लावून मोठ्या आवाजात संगीत ऐकू नका. 


4. जिममध्ये गेल्यावर तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करू नका, तर हळूहळू वाढवा. 


5.जिममध्ये जाण्यापूर्वी जास्त प्रोटीन आिण चरबीयुक्त पदार्थ न खाणे योग्य राहील. याचे पचन लवकर होत नाही. 


6. जिमवरून आल्यानंतर लगेच जेवण करू नका. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. थोड्या विश्रांतीनंतर जेवण करा. 

बातम्या आणखी आहेत...