आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी सरकार देतं का... सरकार? उरली तीन दिवसांची मुदत, ...अन्यथा राष्ट्रपती राजवट ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुष्काळाने हाेरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन देत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका लढवल्या. जनतेनेही आश्वासनांवर विश्वास ठेवत युतीला हात राखून का हाेईना काैल दिला. मात्र, अतिवृष्टीमुळे बळीराजा उद‌्ध्वस्त झालेला असताना युतीत १३ दिवसांपासून सत्तेसाठी भांडणे सुरू अाहेत. विराेधी बाकावरील काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तासंघर्षाचा तमाशा बघण्यात मग्न आहेत. सत्तेच्या या साठमारीत पिचलेल्या बिचाऱ्या शेतकऱ्याला व सर्वसामान्य नागरिकांवर 'कुणी सरकार देता का सरकार?' म्हणण्याची वेळ आलीय.

उरली तीन दिवसांची मुदत
महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत ९ नाेव्हेंबरपर्यंत आहे. ताेपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन हाेण्याची गरज आहे. मात्र, भाजप- शिवसेनेतील सत्तासंघर्षामुळे या मुदतीत नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

...अन्यथा राष्ट्रपती राजवट ?
ठरलेल्या मुदतीत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. मात्र, युतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांच्यात एकमत हाेण्यासाठी राज्यपाल स्वत:च्या अधिकारात या दाेन्ही पक्षांना समन्वयासाठी वाढीव मुदत देऊ शकतात.