आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या केवळ 4 महिन्यानंतरच येत आहेत प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्या, मॅगझिनने लिहिले, दोघांमध्ये रोज होते भांडण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला केवळ चार महिने झाले आहेत आणि लगेच दोघेही वेगळे होण्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. यूएसध्या OK मॅगझिनने आपल्या सूत्रांद्वारे माहिती दिली आहे की, निक आणि प्रियांका यांच्यामध्ये सध्या वाद होत आहेत आणि दोघेही वेगळे होण्याचा विचार करत आहेत. मॅगझिनच्या रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्न करण्याची फार घाई केली आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळच दिला नाही. याच कारणामुळे त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत. 

- मॅगझिनच्या सूत्रांनी हेदेखील सांगितले आहे की, निकला वाटायचे प्रियांका कूल आणि समजदार मुलगी आहे. पण लग्नानंतर त्याला असे जाणवले की, त्याच्या पत्नीचा स्वभाव कंट्रोलिंग आहे. मॅगझिनच्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, जोनस फॅमिलीला असे वाटायचे की, प्रियांका एक मॅच्युअर स्त्री आहे आणि सेटल होऊन आपल्या बाळाबद्दल विचार करेल पण आता प्रियांकाच्या सासरच्या मंडळींना वाटते आहे की, ती एका 21 वर्षांच्या मुलीसारखी वागते आहे. 

- मात्र, प्रियांकाच्या काही जवळच्या व्यक्तींनी सांगितल्यानुसार, या रिपोर्टमधील बातमीमध्ये काहीही सत्यता नाही. ते दिघे एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि यावेळी मियामीमध्ये सासरच्यांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. 

डिसेंबरमध्ये केले होते दोघांनी लग्न...  
प्रियांका - निकचे लग्न 1-2 डिसेंबरला जोधपुरच्या उम्मैद भवन पॅलेसमध्ये झाले होते. त्यांनी दोन रीति-रिवाजांनी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांनी 4 वेडिंग रिसेप्शन ऑर्गनाइज केले होते. 

बातम्या आणखी आहेत...