Home | Khabrein Jara Hat Ke | Dog ate 80 year old man, dog owner charged for murder

कुत्र्याने वृद्ध माणसाला फाडून खाल्ले, दोन महिलांवर हत्येचा गुन्हा दाखल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:14 PM IST

महिलांच्या निष्काळजीपणामुळे त्या वृद्धाचा जीव गेला.

 • Dog ate 80 year old man, dog owner charged for murder

  लिव्हरपूल - इंग्लंडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडच्या लिव्हरपूल परिसरात बुल मास्टीफ जातीच्या कुत्र्याने एका 80 वर्षाच्या वृद्धाला मारून खाल्ले. ही घटना होत असताना दोन महिला हा सगळा प्रकार पाहात होत्या पण त्यांनी कुत्र्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही.


  - येथे राहणारी हेली सुले आणि डॅला वुड्सने त्यांच्या कुत्र्याला आंगणात सोडले होते. त्यांनी 45 तासापासून त्या कुत्र्याला काही खायला दिले नव्हते.

  - भर उन्हात त्यांनी त्याला अंगणात सोडले होते, त्यात त्याला खायला-प्यायला काहीच नव्हते.

  - भुकेने व्याकुळ झालेल्या कुत्र्याला शेजारच्या घरातून खाण्याचा वास आला आणि तो त्या घरात गेला.

  - शेजारील व्यक्तीने घराचे दार उघडताच कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला फाडून खाल्ले.


  महिलांनी अडवले नाही

  - शेजारच्या लोकांनी आवाज ऐकून पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली.

  - त्या कुत्र्याच्या मालक असलेल्या दोन महिला हा सगळा प्रकार पाहत होत्या. त्यांनी त्या कुत्र्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही.


  पोलिसांवरही केला हल्ला

  घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चिडलेल्या कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर गोळी चालवावी लागली.

  सदोष मुष्यवधाचा गुन्हा

  - सगळे पुरावे आणि परिस्थिती पाहता, हा हल्ला थांबवता आला असता. कुत्र्याला अशा परिस्थितीत आणल्यामुळे त्याच्या मालक असलेल्या महिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Trending