आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलवडीतील गर्भवतीसह पाच जणांना कुत्र्याचा चावा; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- तालुक्यातील चिलवडी येथील गर्भवती महिलेसह पाच जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. ही घटना मंगळवारी (दि.८) सकाळी ९ ते १० च्या सुमारास घडली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या चार जणांना रिअॅक्शन झाल्याने सोलापूरला रेफर केले आहे.

 
चिलवडी येथील पाच जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. यामध्ये गीता जाधव (२८)या गर्भवती महिलेसह तीन वर्षाचा श्रीशैल जाधव, पूजा शेळके (१८), गोविंद जाधव (३०), शीलरत्न भालशंकर (४०) यांचा समावेश आहे. पिसाळलेला कुत्रा चावलेल्या पाच जणांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान पाचही रुग्णांना लसीचा डोस देण्यात आला. यामधील तिघांना लसीचे रिअॅक्शन झाल्याने त्यांना सोलापूर येथे रेफर केले आहे. तीन वर्षाच्या बालकाला कोणतेही रिअॅक्शन न झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिलवडी गावातील पाच जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात सायंकाळपर्यंत शुकशुकाट असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग केला मात्र, तो गावालगतच्या शेतात घुसला. 
 

बातम्या आणखी आहेत...