Home | Khabrein Jara Hat Ke | Dog Escapes Its Enclosure and Kills Over 600 Chickens

अचानक दगवतात पोल्ट्री फार्ममध्ये 600 कोंबड्या.....सत्यता समोर आल्यावर मालकाला बसतो धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 03:17 PM IST

मालकाला वाटले कोणीतरी खुनशी वृत्तीने केले असावे नुकसान.

 • Dog Escapes Its Enclosure and Kills Over 600 Chickens

  निंगगुओ - चीन मधील एका पोल्ट्री फर्म मालकाला अचानक धक्का बसतो.  जेंव्हा त्याच्या ६०० कोंबड्या मेलेल्या अवस्थेत त्याला दिसतात. बघताच क्षणी त्याला वाटते कोणीतरी खुनशी वृत्तीने असे केले असावे अथवा एखाद्या हिंस्र प्राण्याने ही हानी केली असवी. तेवढ्यात शेजारी असणारा कुत्रा तोंडात कोंबडी धरून त्याच्या समोर आला आणि तेंव्हा घडलेला सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. पाळीव असणारा हा कुत्रा त्याच्या गळ्यातील बेल्ट तोडून शेजारी असणाऱ्या पोल्ट्री फर्म  मध्ये शिरला होता आणि तेंव्हाच त्याने हे नुकसान केले.

   
  मेलेल्या अवस्थेत पहिल्या कोंबड्या 
  चिनी माध्यमांच्या अहवालानुसार हा सर्व प्रकार 29 ऑक्टोबर रोजी अनहुई प्रांतातील निंगुओ येथे झाला.पोल्ट्री फार्म मालक सकाळी जेंव्हा तेथे पोहचले तेंव्हा झालेले नुकसान पाहून त्यांच्या अक्षरशःत्याच्या डोळ्यात पाणी आले.

   

  -त्यांनी पहिले पोल्ट्री फार्म मध्ये सर्वच्या सर्व कोंबड्या मारून पडलेल्या होत्या त्याला पहिल्यांदा वाटले की, कोणीतरी खुनशी वृत्तीने जुन्या वादातून जाणून बुजून हे नुकसान केले असावे.अथवा हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून केले असावे.

   - तसे पुरावे कुठे आढळतात का हे तपासात असतांना तेवढ्यात शेजारील पाळीव कुत्रा पोल्ट्री फार्म  बाहेर घुटमळत होता. आणि त्याने तोंडात एक मेलेली कोंबडी त्याने दाबून धरलेली होती.

   
  सव्वा लाख रुपये द्यावी लागली नुकसान भरपाई 
  - त्यानंतर पोल्ट्री फार्म मालक सरळ कुत्र्याच्या मालकाकडे गेला आणि त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेवढ्यावरच न थांबता ६०० कोंबड्यांची नुकसान भरपाई देखील त्याने मागितली. 
   - त्यांच्यात बोलण्या बोलण्यावरून वाद झाल्याने हा वाद मिटविण्यासाठी शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी यावर मध्यस्थी करून मार्ग काढत सव्वा लाख रुपये भरपाई देण्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमधील वाद मिटला. 

Trending