आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्हिडिओ डेस्क - देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण अनेकदा ऐकलेली असेल. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहणार आहात, ते पाहिल्यानंतर तुम्हाला यावर अधिकच विश्वास बसेल.
ईस्ट आफ्रिकेच्या तंजानियाच्या टुंड्रामधील जंगलांमध्ये फिरताना हा कुत्रा मृत्यूच्या दाढेत म्हणजेच दोन सिंहांच्या तावडीत अडकला. त्याठिकाणी दोन सिंह आराम करत होते. पण शिकार येत असल्याचे दिसतात हे सिंह लगेचच सज्ज झाले. व्हिडिओत हे पाहिल्यानंतर ते कुत्र्याला शिकार बनवणार असे स्पष्ट वाटते.
पण आपल्याला काय वाटते यापेक्षा प्रत्यक्षात काय घडते हे महत्त्वाचे आहे. कारण इथे संपूर्ण चित्र बदलले आणि कुत्रा जीव वाचवून पळण्यात यशस्वी ठरला. एक छोटासा कुत्रा दोन सिंहांच्या तावडीतून कसा पळाला हेही रंजक आहे. हा कुत्रा केवळ सिंहांवर भुंकलाच नाही तर त्याने सिंहांना चावण्यासाठीही त्याने उडी घेतली. सिंहांना अनेक पावले मागे सरकारयला लावूनच तो तिथून निघाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.