आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसांपेक्षा जनावरे बरी/ नवजात मुलीला गटारात फेकून महिलेने काढला पळ, कुत्र्याने वाचवला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैथल(हरियाणा)- येथे एका महिलेने काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीला नाल्यात फेकून पळ काढला. त्या मुलीचे नशीब बलवत्तर म्हणून, एका कुत्र्याने तिला बाहेर काढून तिचा जीव वाचवला. मुलीला बाहेर काढल्यानंतर कुत्रा भुंकत राहीला, कुत्र्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात भर्ती केले. सध्या तिची अवस्था स्थिर असून ती डॉक्टरांच्या निगराणीत आहे.


घटना शहरातील डोगरा गेटजवळ गुरुवारी पहाटे घडली. महिलेने पहाटे 4.18 वाजता मुलीला नाल्यात फेकले आणि 4 .27 ला एका कुत्र्याने तिला बाहेर काढले. ही संपूर्ण घटन सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुलीला सगळ्यात आधी मुखत्यार नावाच्या व्यक्तीने पाहीले. त्याने सांगितले की, "मी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून घराबाहेर आलो. तिथे कुत्रा पॉलिथीनच्या पिशवीजवळ दिसला. त्यावेळी एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर मी शेजाऱ्यांना गोळा केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आल्यावर मुलीला रुग्णालयात भर्ती केले." 


उपचारासाठी चंडीगडला पाठवले
पोलिसांनी सांगितले की, सकाळी मुलीचा प्रकृती गंभीर होती. संध्याकाळी तिच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा झाल्यावर डॉक्टरांनी पीजीआय चंदीडगला रेफर केले. दरम्यान पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.