आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिनसिनाटी- अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहणारे एक कुटुंब आपल्या पाळीव कुत्र्यावर खुप प्रेम करतात आणि त्याला कुटुंबातील सदस्या मानतात. पीटबुल जातीच्या या कुत्र्यावर त्यांचा विश्वास तेव्हा आजूनच वाढला जेव्हा त्या कुत्र्याने मुलाचा जीव वाचवला. त्यावेळस घरातील सगले मेंबर्स झोपले होते पण कुत्र्याच्या अलर्टपणामुळे तो वाचला.
अचानक पलंगाजवळ उभा राहीला कुत्रा...
- अमेरिकेच्या ओहियो स्टेटमध्ये राहणारे कपल टोनी आणि ट्रेसी डेनियल्सने आपल्या घरात पीटबूल जातीचा कुत्रा पाळला आहे. तो त्यांच्या घरी 2014 पासून होता. त्या कुत्र्याचे नाव एंबर आहे.
- काही दिवसांतच एंबर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्या प्रामाणे झाली आणि त्यांच्या मुलाची खुप खास फ्रेंड झाली.
- डेनियल्स कुटुंबाला एंबरवर त्या दिवशी जास्त विश्वास बसला जेव्हा तिच्यामुळे त्यांच्या मुलाला मेडिकल इमरजेंसी आल्याचे कळाले.
बाथटबमध्ये पडला मुलगा
- ट्रेसीने सांगितले की, आम्ही त्या दिवशी झोपलो होतो, तेव्हा एंबर अचानक आली आणि आपले दोन्ही पाय वर उचलून विचीत्र आवाज काढु लागली. तेव्हा मी खुप घाबरले कारण याआधी तिने असे आवाज कधीच काढले नव्हते.
- त्यानंत ट्रेसीला कळाले की, तिचा मुलगा ट्रे तिथे नव्हता. तत्काळ ती बाथरूममध्ये धावत गेली आणि पाहिले की, ट्रे बाथटबमध्ये पूर्णपणे बुडाला होता.
- खरतर त्यादिवशी ट्रे जेव्हा बाथरूममध्ये गेला होता तेव्हा त्याला झटका आला आणि तो बाथटबमध्ये पडला.
- वेळेवर जर त्याला मदत मिळाली नसती तर त्याचा जीव वाचला नसता. या सगळ्याचे श्रेय ट्रेसी त्यांचा कुत्रा एंबरला देते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.