आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती तरुणीच्या पोटाजवळ येऊन रोज रडायचे श्वान, Medical Tests मध्ये समोर आली धक्कादायक माहिती..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका गर्भवती तरुणीचा डॉगी गेल्या काही दिवसांपासू विचित्र वर्तन करत होता. तिला आपल्या श्वानाचे असे वागणे कळलेच नाही. घरात बसलेली असताना किंवा झोपलेली असताना ते श्वान सुद्धा महिलेच्या शेजारी तिच्या पोटाजवळ येऊन बसायचे. यानंतर पोटाला नाक लावून रडण्यास सुरुवात करायचे. कित्येक दिवसांपासून श्वान असेच करत होते. यानंतर महिलेने आपल्या कुटुंबियांसह पोटात नेमके काय याचा शोध घेण्यासाठी रुग्णालय गाठले. या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये गर्भवती महिलेच्या पोटात एक गंभीर आजार होता अशी माहिती समोर आली. विशेष म्हणजे, तिने उपचारासाठी थोडासाही विलंब लावला असता तर तिच्यासह बाळाचे आयुष्यही धोक्यात होते. 


असा वाचवला जीव
- एलेना आणि तिचा पती रिकी यांनी जपानी ब्रीडचे फीमेल श्वान 'अकीता' घरात ठेवले आहे. 21 वर्षीय एलेना गर्भवती असताना तिची डॉगी (किओला) खूप प्रोटेक्टिव्ह झाली होती. डॉगी एलेनाची साथ सोडण्यास तयारच नव्हती. एलेनाला कुणी हातही लावला की ती आक्रमक व्हायची. परंतु, गेल्या काही दिवसांपासून श्वान एलेनाच्या पोटाला नाक लावून रडत होते. एलेनाने सांगितल्याप्रमाणे, 'किओला मला टक लावून पाहायची आणि तिच्या डोळ्यात पाणी यायचे. ती किंचाळून रडायची. माझ्या आईने एक दिवस सांगितले, की श्वान तुला काही सांगू इच्छिते. परंतु, मुके जनावर काय बोलणार. काही दिवसांत श्वान पोटाजवळच येऊन का रडतेय, पोटातील बाळाला तर काही झाले नाही ना? या विचाराने मी प्रचंड घाबरले.'
- एलेनाने आपल्या कुटुंबियांसह रुग्णालय गाठले आणि संपूर्ण चाचण्या करून घेतल्या. त्यावेळी डॉक्टरांना एलेनाच्या शरीरात गंभीर इन्फेक्शन दिसून आले. इन्फेक्शन इतके वाइट होते की तिला वेळीच रुग्णालयात दाखल करावे लागले. वैद्यकीय तपासात एलेनाच्या शरीरात दोन गंभीर स्वरुपाच्या संक्रमणाचा पत्ता लागला. तिच्या शरीरात एक अॅण्टीबायोटिक रेसिस्टंट बग सुद्धा सापडला. हा बग तिच्या किडनीत होता. या आजारामुळे तिचे आणि तिच्या पोटातील बाळाचे जीव धोक्यात सापडले होते.


तर गेला असता मायलेकाचा जीव
हॉस्पिटल गाठल्यानंतर पुढील 4 आठवडे एलेनाला आयसीयूमध्ये ठेवावे लागले. पूर्णपणे बरी झाल्यानंतरच ती घरी पोहोचली. यानंतर तिच्या पोटातील बाळाला काहीच धोका नाही असे डॉक्टरांनी जाहीर केले. डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी सांगितले, की तिच्या शरीरातील संक्रमण इतके गंभीर होते की थोडासाही विलंब झाल्यास तिच्यासह बाळाच्या आयुष्याला धोका होता. आपला आणि बाळाचा जीव डॉगीनेच वाचवला असे एलेना मानते. तिने सांगितल्याप्रमाणे, तिच्या शरीरात बिघाड झाला हे श्वानाला फक्त श्वास घेऊनच लक्षात आले होते. हेच कारण होते की श्वान वारंवार पोटाला नाक लावून रडत होते. या घटनेनंतर अख्खे कुटुंब त्या श्वानाच्या अगदी जवळ आले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यापेक्षा जास्त ते या श्वानाला मानतात. तिच्यासाठी कुटुंबियांच्या मनात आता विशेष आदर आहे.

बातम्या आणखी आहेत...