Home | International | Other Country | Dog saves toddler from deadly snake

17 महिन्यांच्या मुलीला जमिनीवर ओढत होता कुत्रा, अवस्था पाहून घाबरली आई, नंतर समजले हे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 12:36 PM IST

खरं तर हा कुत्रा मुलीला एका विषारी सापापासून वाचवून आणत होता. साप त्या कुत्र्यालाही चावला होता.

 • अथर्टन - ही कथा आहे ऑस्ट्रेलियाच्या राहणाऱ्या एका महिलेची आणि तिच्या पाळीव कुत्र्याची. महिलेने काही दिवसांपूर्वीच का कुत्रा आणला होता. एक दिवस हा कुत्रा महिलेच्या 17 महिन्यांच्या मुलीला गार्डनमधून दातांनी धरून जमिनीवरून ओढत आणताना दिसला. हे पाहून महिला घाबरली आणि कुत्र्याजवळ पोहोचली. त्यानंतर तिला खरे काय ते समजले. खरं तर हा कुत्रा मुलीला एका विषारी सापापासून वाचवून आणत होता. साप त्या कुत्र्यालाही चावला होता.


  मुलीला जमिनीवरून ओढत होता कुत्रा
  - हे प्रकरण काही वर्षांपूर्वीचे आहे. कॅथरीन आणि तिच्या पतीने एक पाळीव कुत्रा घरी आणला होता. काही दिवसांतच या कुत्र्याची कुटुंबातील सर्वांबरोबर गट्टी जमली.
  - कॅथरीनच्या दीड वर्षांच्या मुलीबरोबर म्हणजे शरलॉटशिवाय तो कुटुंबातील इतर सर्वांबरोबर खेळायला लागला होता.
  - एक दिवस शरलॉट अथर्टन घराच्या गार्डनमध्ये खेळत होती. त्याचवेळी कुत्र्याने तिच्या नॅपीला पकडले आणि तो जमिनीवरून तिला ओढत नेऊ लागला. त्याने तिला ओढत नेत गार्डच्या दुसऱ्या भागात नेऊन टाकले.
  - नंतर काही वेळात कुत्र्याने तिला ओढत घरात नेते. कॅथरीन हे सर्व पाहून घाबरली. तिला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
  - ती वेगाने त्यांच्याकडे धावली. तेव्हा ती धक्क्यामध्ये होती.


  नंतर समजले कारण
  - कॅथरीनने सांगितले की, मी गार्डनमधील गवताकडे पाहता, मला कुत्र्याच्या अशा वागण्यामागचे कारण लक्षात आले.
  - कॅथरीनने त्याठिकाणी एक विषारी साप पाहिला. तो कुत्र्यालाही चावला होता. पण कुत्र्याने शरलॉटला त्या सापापासून वाचवले होते.
  - कॅथरीनने सांगितले की, काही वेळातच कुत्रा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पण कॅथरीनने लगेचच त्याला दवाखान्यात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार झाले आणि तो बरा झाला.

 • Dog saves toddler from deadly snake
 • Dog saves toddler from deadly snake

Trending