आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपासून या रस्त्यावर येऊन थांबायचा कुत्रा, कोणालाच माहीत नव्हते कारण, कोणी त्याच्या जवळ जाताच पळून जायचा तो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होहोत- चीनच्या एका कुत्र्याचा व्हडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा कुत्रा दोन महिन्यांपासून रोज एका रस्त्यावर येऊन त्याच्या मालकीनीची वाट पाहात उभा राहायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणीच त्याच्या मालकीनीचे एका अपघातात निधन झाले होते. त्याची गोष्ट एैकुन अनेक लोक ईमोशनल होत आहेत. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहीले आहे. 


अपघातात झाले मालकीनचे निधन

>> ही घटना चीनच्या इनर मंगोलिया स्टेटच्या होहोत शहरात राहणाऱ्या एक कुत्र्याची आहे. ज्याने आपल्या ईमोशनल स्टोरीने लोकांच्या डोळ्यात पाणी आणले. हा कुत्रा रोज शहराच्या एका रहदारी वाल्या रस्त्यावर येऊन थांबायचा.  

 

>> रस्त्यावर तासंतास थांबून आपल्या मालकीनच्या येण्याची वाट पाहायचा. त्याच्या मालकीनचे काही दिवसांपुर्वी एका अपघातात निधन झाले होते. ज्या ठिकाणी त्याच्या मालकीनचे निधन झाले, त्याच ठिकाणी तो थांबायचा.

 

>> त्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात तो मध्यरात्री त्याच ठिकाणी थांबलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो खुप उदास दिसत आहे. त्याचा व्हिडिेओ शुट करणाऱ्याने जेव्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळून गेला. 

 

>> गुओ नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले की, 'मी याला रोज इथे पाहतो, मागच्या दोन महिन्यांपासून हा इथे येत आहे. वारा, पाउस, थंडी काहिही असले तरी हा रोज येतो.'


सोशल मीडियावर हिट झाला व्हिडिओ

>> कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच हिट झाला. एका रात्रीत तो कुत्रा स्टार झाला. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाख लोकांनी पाहीले आहे. या व्हडिओने सोशल मिडियावरच्या लोकांची मने जिंकली आहेत.

बातम्या आणखी आहेत...